Total Pageviews

Thursday, October 24, 2024

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने (Guest Lecture) अतिथी व्याख्यान संपन्न - दिनांक ०८ सप्टेंबर २०२४

 

 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,

अर्थशास्त्र विभाग 

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने (Guest Lecture)

 अतिथी व्याख्यान  संपन्न 

दिनांक ०८ सप्टेंबर २०२४ रोजी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बी. ए. च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील व एम. ए. च्या  विध्यार्थ्यांकरिता  अतिथी व्याख्यानाचे आयोजन केले होते. 

अतिथी व्याख्यान , वेळ- सकाळी ९. १५  वाजता 

विषय- पुरवठ्याचा नियम 

साधन व्यक्ती- प्रा. सुजाता पाटील, वाणिज्य विभाग, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई 

विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सदरील अतिथी व्याख्यानाचा लाभ घेतला 

 निवडक छायाचित्रे 
















अर्थशास्त्र विभागाच्या वतीने (ICT - Guest Lecture) अतिथी व्याख्यान संपन्न- दिनांक ०८ सप्टेंबर २०२४


 

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,

अर्थशास्त्र विभाग 

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने (ICT - Guest Lecture)

 अतिथी व्याख्यान  संपन्न 

दिनांक ०८ सप्टेंबर २०२४ रोजी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बी. ए. च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील व एम. ए. च्या  विध्यार्थ्यांकरिता  अतिथी व्याख्यानाचे आयोजन केले होते. 

अतिथी व्याख्यान, वेळ- सकाळी १०.०० वाजता

विषय- भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल  

साधन व्यक्ती- प्रा. रोहित पाटील, वाणिज्य विभाग, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई


विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सदरील अतिथी व्याख्यानाचा लाभ घेतला 

 निवडक छायाचित्रे 































 निवडक व्हिडीओ 





Tuesday, October 22, 2024

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे मंडळ उद्घाटन सोहळा संपन्न: २२.१०.२०२४

 



यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे मंडळ उद्घाटन  सोहळा संपन्न: 


( विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार ठेवून प्रगतीचा मार्ग निवडावा : मा. डॉ . सतिश कदम)


दिनांक २२.१०.२०२४, वार मंगळवार रोजी म. शि. प्र. मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली  सामाजिक शास्त्रे मंडळ उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून बोलताना   जनविकास महाविद्यालय बनसारोळा येथील प्रा. डॉ. सतीश कदम  यांनी आज सामाजिक शास्त्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार रुजवण्याची गरज प्रतीपदित केली. व  याच सकारात्मक विचाराच्या जोडीने तुमचा प्रगतीचा मार्ग निवडावा असे सांगितले. समाजरूपी जग टिकवून ठेवायचे असेल तर या  समाजातील प्रत्येक घटनेकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे गरजेचे असून सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांनी वर्तमान स्थितीचा अभ्यास केला पाहिजे व  त्याचवेळी इतिहासाचे दाखले देखील वेळेनुरुप,परिस्थितीनुरूप विचारात घेणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले. 

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ म्हणाले की, सामाजिक शास्त्र ही विध्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाण निर्माण करतात त्या माध्यमातून माणूस म्हणून आपली कर्तव्ये विद्यार्थ्यानी व्यवस्थित पार पाडावीत असे प्रतिपादन केले. या प्रसंगी व्यासपीठावर  सामाजिक शास्त्रे मंडळाचे समन्वयक डॉ.दीपक भारती, डॉ . अनंत मरकाळे, डॉ. संजय सुरेवाड, डॉ. प्रकाश लोखंडे यांची उपस्थिती होती.   

कार्यक्रमाची सुरुवात  प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. तद्नंतर  सामाजिक शास्त्रे मंडळाचे समन्वयक डॉ. दीपक भारती यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या अयोजानामागची भूमिका व्यक्त केली. या कार्यक्रमात सामाजिक शास्त्रे मंडळ विद्यार्थी पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. कु. गायत्री तुरे, कु, प्रगती सुरवसे व कु. राणी साळवे  या विध्यार्थीनिनी आपले मनोगत व्यक्त करून सामाजिक शास्त्रे विद्यार्थी म्हणून आमच्या व्यक्तिमत्व विकासास कसे मदत करतात, हे अभिव्यक्त केले. त्यानंतर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, लोकप्रशासन, भूगोल, गृहशास्त्र या सर्व विषयांच्या विद्यार्थांनी तयार केलेल्या भित्ती पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सोहळ्याचे सूत्र संचालन  अर्जुन सोनटक्के या  विद्यार्थ्याने  केले तर आभार प्रदर्शन सामाजिक शास्त्रे मंडळाचा सदस्य शिवम पुरी या विद्यार्थ्याने केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ . मुकुंद राजपंखे, डॉ. अहिल्या बरुरे, डॉ. दिलीप भिसे, डॉ. अरविंद घोडके, डॉ. मनोरमा पवार, डॉ. रोहिणी खंदारे, डॉ . रुपेश देशमुख, डॉ. राजाभाऊ भगत, प्रा. सुशीलकुमार आचार्य, प्रा. राठोड मॅडम, प्रा. राठोड, प्रा. चाटे मॅडम, डॉ. संजय जाधव तसेच इतर सर्व प्राध्यापक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाची निवडक छायाचित्रे 

















वर्तमानपत्रातील बातमी 











अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...