मराठवाडा शिक्षण
प्रसारक मंडळ संचलित,
यशवंतराव चव्हाण
महाविद्यालय, अंबाजोगाई,
उन्नत भारत अभियान कक्ष
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांकडून उन्नत भारत
अभियानांतर्गत दत्तक गाव जोगाईवाडी येथे प्रजासत्ताक दिन साजरा.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण
महाविद्यालय अंबाजोगाई येथील उन्नत भारत अभियान कक्षाचे सदस्य आणि स्वयंसेवक यांनी तालुक्यातील
मौजे जोगाईवाडी
येथे जावून ग्रामस्थासोबत व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सोबत प्रजासत्ताक दिन साजरा
केला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा जोगाईवाडी येथील
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. हा कार्यक्रम
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उन्नत भारत
अभियान कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. दीपक भारती, सह-समन्वयक प्रा. डॉ. अहिल्या बरुरे, डॉ.
अरविंद घोडके, डॉ. अनंत मरकाळे, डॉ . रोहिणी खंदारे, प्रा. सुशीलकुमार आचार्य यांनी राबविला व कु. गायत्री तुरे, कु. सानिया शेख, कु. प्रिया कांबळे, कु. धनश्री भिसे. कु.अश्विनी कांबळे, कु.
माया मरकड, कु. पल्लवी, कु. सागर मिरासे, कु. पूर्वा साळुंके या विध्यार्थीनिसह चि. आर्यन बलाढ्ये, चि. जीशान शेख व चि. संकेत पवार आदी विद्यार्थिनी सक्रीय सहभाग नोंदवला. स्वयंसेवकांनी
गावातील लोकांच्या स्वच्छतेविषयीच्या अडी अडचणी जाणून घेतल्या व गावाच्या विकास
योजनांबाबत ग्रामसभेच्या माध्यमातून माहिती घेतली. प्रारंभी ग्रामपंचायतीच्या
वतीने गावच्या सरपंच मा. सौ. मनीषाताई दोडतले यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन पार पडले. या कार्यक्रमास उपसरपंच श्री सुनील
बाबुराव मस्के, सर्व ग्रामपंचायत सदस्य मा, . श्री
बाळासाहेब दोडतले, ग्राम विकास अधिकारी श्री. बी. डी. जांभळे, मुख्याध्यापक श्री जे. डी. सावंत, श्री बालाजी नरहारी घाडगे, श्री
दीपक घाडगे, शाळेतील सर्व शिक्षक व गावातील लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. हा
कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत जोगाईवाडी , जिल्हा
परिषद प्राथमिक विद्यालय, जोगाईवाडी येथील सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ या सर्वांचे सहकार्य लाभले.
प्रमुख छायाचित्रे