यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,
अर्थशास्त्र विभागाच्या वतीने
Under MOU Activities
(National Level Online Workshop)
राष्ट्रीय कार्यशाळा
अर्थशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न:
अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये दि.18 मार्च 2026 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग आणि राजश्री शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूर, अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने (MOUअंतर्गत) संशोधन पद्धती या विषयावर एक दिवशीय ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून राजश्री शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूर चे मा. प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे उपस्थित होते, तर, उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट यांनी विध्यार्थी व प्राध्यापक यांच्या दृष्टीने संशोधन पद्धती अतिशय महत्वाची असून शैक्षणिक धोरण २०२० नुसार सर्वच स्तरावरील विध्यार्थ्यांना संशोधन पद्धती उपयोगाची असून सदरील कार्यशाळा विध्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर सामाजिक प्रश्न योग्य पद्धतीने सोडविण्यासाठी योग्य संशोधन पद्धती संशोधकाकडून उपयोगात आणली तरच अपेक्षित निकाल मिळू शकतो असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक (अर्थशास्त्र विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई) डॉ. दीपक भारती यांनी केले व कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू व आवश्यकता सर्वांसमोर मांडली. कार्यशाळेचे बिजभाषक व साधनव्यक्ती म्हणून डॉ. मनोहर बी. येरकलवार (इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विद्यापीठ, अमरकंटक, मध्य प्रदेश ) यांचा परिचय डॉ. बी. पी. गाडेकर (अर्थशास्त्र विभाग प्रमुख, राजर्षी शाहू महाविद्यालय, स्वायत्त, लातूर) यांनी करून दिला. कार्यशाळेचे मार्गदर्शक डॉ. मनोहर बी. येरकलवार यांनी "संशोधन पद्धती "या विषयावर बोलताना संशोधन पद्धतीचा अर्थ, व्याख्या, संशोधनाची उद्दिष्ट्ये, संशोधनाचे प्रकार ,संशोधन प्रक्रिया (Steps): समस्या निश्चिती, साहित्याचे पुनरावलोकन, गृहीतके (Hypothesis) मांडणे, संशोधन आराखडा (Research Design), नमुना निवड (Sampling), माहिती संकलन (Data Collection), विश्लेषण आणि अहवाल लेखन, संदर्भ सूची या सर्व बाबतीत अतिशय सखोल असे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे सूत्र संचलन प्रा. जे. एच. गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आर. एन. जाधव (अर्थशास्त्र विभाग, राजश्री शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूर) यांनी केले. कार्यशाळेसाठी राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी , पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी Microsoft Teams या माध्यमातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यशाळेसाठी १६२ संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी online नोंदणी केली तर १०० पेक्षा अधिक विध्यार्थी दोन्ही महाविद्यालयातून online / offline उपस्थित होते. सदरील कार्यशाळा आयोजित करण्यासाठी दोन्ही महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक (डॉ. मनोरमा पवार, प्रा. आरती मुळे, प्रा. एन. आर. वाळके ) व तांत्रिक बाजू सांभाळणारे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यशाळेची छायाचित्र
.jpg)

.jpg)







.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)
.png)





















