Total Pageviews

Monday, August 12, 2024

"केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25" या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न:






यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात "केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25" या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न: 



यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, जिल्हा बीड येथे अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या  संयुक्त विद्यमाने "केंद्रीय अर्थसंकल्प 2024- 25 व युवा विकासासाठीच्या योजना" या विषयावर 12 ऑगस्ट 2024 रोजी आंतरविद्याशाखीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले होते. 
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवदास शिरसाठ होते. तर कार्यक्रमासाठी उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक  म्हणून डॉ. पुरुषोत्तम देशमुख (प्रोफेसर,अर्थशास्त्र विभाग, डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर) हे उपस्थित होते .  प्रारंभी कार्यशाळेचे समन्वयक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक भारती यांनी प्रास्ताविक मांडून कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका सर्वांसमोर व्यक्त केली. डॉ.पुरुषोत्तम देशमुख यांनी "केंद्रीय अर्थसंकल्प व युवा विकासासाठीच्या योजना" या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले, विशेषतः शिक्षण, आरोग्य  व कौशल्य याबाबतीत अर्थसंकल्पातील तरतुदी व  योजना देशातील  युवकांना तर वाव निर्माण करून देतातच, त्यासोबतच या माध्यमातून समाजाची घडी नीट नेटकी होण्यास मदत होते, जी अत्यंत महत्वाची बाब ठरते असे मत व्यक्त केले. कार्यशाळेच्या  दुसऱ्या सत्रासाठी साधन व्यक्ती तथा मार्गदर्शक म्हणून डॉ. शालिनी कदम (अर्थशास्त्र विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ) या उपस्थित होत्या .त्यांनी "केंद्रीय अर्थसंकल्प व जेंडर बजेटिंग" या विषयावर  सविस्तर मार्गदर्शन केले. 2005 पासून भारत सरकारने स्वीकारलेले लिंगभाव आधारित अर्थसंकल्प हे साधन अत्यंत महत्वाचे असून याबाबतीत केल्या जाणाऱ्या तरतुदी आणखी वाढण्याची गरज त्यांनी याप्रसंगी प्रतीपदित केली. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलताना अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी  अर्थसंकल्प कसा महत्वाचा असतो याबाबत बोलताना अर्थव्यवस्थेत रुपया कसा येतो आणि तो कसा खर्च होतो याकडे  सर्वसामान्य नागरिक करदाता म्हणून जे निरीक्षण करतो ती अत्यंत महत्वाची बाब ठरते असे मत मांडले. पाहुण्यांचा परिचय डॉ.रोहिणी खंदारे व डॉ. मनोरमा पवार यांनी करून दिला. 
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग सह-समन्वयक डॉ.अहिल्या बरुरे यांनी केले तर आभार सह-समन्वयक डॉ. अनंत मरकाळे यांनी व्यक्त केले. कार्यशाळा झूम प्लॅटफॉर्म व यूट्यूब या माध्यमातून संपन्न झाली. सदरील ऑनलाइन कार्यशाळेत 100 पेक्षा अधिक प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी प्रतिनिधींनी सहभाग  घेतला.

कार्यशाळेची निवडक  छायाचित्र व व्हिडिओ लिंक


 



यू ट्यूब व्हिडिओ लिंक


Click here 👇







वर्तमानपत्रातील बातम्या  








Thursday, August 8, 2024

संशोधनाचा अंतिम गोषवारा सादर करण्यापूर्वीची पूर्व - मौखिकी संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,

अर्थशास्त्र संशोधन केंद्र

संशोधनाचा अंतिम गोषवारा सादर करण्यापूर्वीची पूर्व - मौखिकी संपन्न 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, अर्थशास्त्र संशोधन केंद्र यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई येथे मानव्य विद्याशाखे अंतर्गत अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती ( पीएच.डी ) पदवीसाठी संशोधनाचा अंतिम गोषवारा सादर करण्यापूर्वीची   संशोधन विद्यार्थी श्री काळे गोविंद रामराव यांची पूर्व मौखिकी  अध्यक्ष  प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, मार्गदर्शक डॉ. दीपक एम. भारती , बहिस्थ पर्यवेक्षक डॉ. अर्जुन मोरे व उपस्थित  सर्व प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत दिनांक 3 मे 2024 वार शुक्रवार रोजी वेळ 12.30 वाजता यशस्वीरीत्या संपन्न झाली .

     संशोधक श्री काळे गोविंद रामराव यांनी अर्थशास्त्र विषयातील  पीएच.डी. पदवीसाठी "मराठवाड्यातील सीमांत शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचे अध्ययन" या विषयावरील आपल्या शोध प्रबंधाचा अंतिम गोषवारा सर्व उपस्थितांसमोर PPT च्या माध्यमातून  सादर केला.  सादरीकरनानंतर  उपस्थित संशोधक व प्राध्यापक यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. प्रस्तुत पूर्व मौखिकी साठी उपस्थितांमध्ये  डॉ. मुकुंद राजपंखे, डॉ. अहिल्या बरुरे, डॉ. दिलीप भिसे, डॉ. नंदकिशोर चीताडे, डॉ. मनोरमा पवार, डॉ. मेघराज मोरे,  ग्रंथपाल गजानन दराडे व इतर संशोधक या सर्वांचा समावेश होता.

निवडक  छायाचित्र  व व्हिडीओ 

















अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...