Total Pageviews

Wednesday, November 27, 2024

संविधान दिनानिमित्त जनजागृतीपर समूह चर्चा (Group Discussion) संपन्न : २६/११/२०२४

 संविधान दिनानिमित्त जनजागृतीपर समूह चर्चा (Group Discussion संपन्न :२६/११/२०२४ 

 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,

सामाजिक शास्त्रे विभाग 


मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे विभाग व  राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची समूह चर्चा आयोजित करण्यात आली होती.  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.शिवदास शिरसाट उपस्थित होते.  तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. प्रकाश लोखंडे, डॉ. रोहिणी खंदारे व डॉ. मनोरमा पवार यांनी विद्यार्थ्यांना  संविधानाबाबत समाजातील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तरुणांनी काय केले पाहिजे याबाबत चर्चेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक शास्त्रे विभागाचे  समन्वयक डॉ. दीपक भारती यांनी केले व विद्यार्थ्यांच्या समूह चर्चा आयोजनामागील भूमिका सर्वांसमोर मांडली. 

समूह चर्चा संपन्न झाल्यानंतर प्रत्येक समूहाच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्यामध्ये कु. नंदिनी शिंदे, कु. दिव्या  कदम, वैष्णवी जोगदंड, धोत्रे काशिनाथ,श्रीराम सोनवणे, काजळे गणेश, प्रेम मांडके व  माऊली पांढरे या विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख प्रा. रोहित पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे डॉ. संजय राठोड यांनी केले. याप्रसंगी  डॉ. दिलीप भिसे, डॉ.संजय जाधव, प्रा. गणेश कोळेकर, प्रा.राजेभाऊ भगत,  डॉ.मुकुंद राजपंखे, प्रा.महेश गोरे , प्रा. अरविंद घोडके , प्रा.संजय सूरेवाड , प्रा. सुशील आचार्य ,  यांची उपस्थिती होती.  या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 निवडक छायाचित्रे 


प्रास्ताविक डॉ. दीपक एम. भारती, समन्वयक, सामाजिक शास्त्रे विभाग , प्रमुख उपस्थिती डॉ. प्रकाश लोखंडे (राज्यशास्त्र विभाग ), डॉ. रोहिणी खंदारे (समाजशास्त्र  विभाग ) व डॉ. मनोरमा पवार (अर्थशास्त्र  विभाग )


समूह चर्चा कार्यक्रमास उपस्थित एन. सी. सी. चे कॅडेट्स व विद्यार्थी 

सूत्रसंचालन -प्रा. रोहित पाटील, विभाग प्रमुख,  राष्ट्रीय छात्र सेना विभाग 



डॉ. प्रकाश लोखंडे, राज्यशास्त्र विभाग 





विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना 

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...