श्री.गोविंद रामराव काळे यांची अर्थशास्त्र पीएच. डी. (विद्यावाचस्पती) साठीची खुली मौखिक चाचणी संपन्न...
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
मानव्यविद्याशाखे अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या मौखिक चाचणीचे आयोजन ऑनलाईन
माध्यमाद्वारे यशस्वीरीत्या संपन्न झाले.
सदरील मौखिकी ही "मराठवाड्यातील सीमांत शेतकऱ्यांच्या आर्थिक व
सामाजिक परिस्थितीचे अध्ययन" या संशोधन विषयावर घेण्यात आली. श्री गोविंद काळे यांनी
आपल्या सादरीकरणाच्या माध्यमातून
मराठवाड्यातील सीमांत शेतकऱ्यांची सामाजिक व
आर्थिक परिस्थिती, शेतकर्यांना मिळणार्या शासकीय योजनेचा आढावा, संशोधनातील महत्वाचे निष्कर्ष, गृहितकांची पडताळणी व सीमांत शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती
सकारात्मकरित्या बदलण्यासाठी
आवश्यक शिफारशी व संशोधनाची पुढील दिशा या सर्व बाबतीत अगदी मुद्देसूदपणे माहिती
देण्यात आली. सदरील संशोधन करताना मराठवाड्यातील 380 महिला आणि
पुरुष सीमांत शेतकरी यांची नमुना निवड करण्यात येवून, मुलाखत
अनुसूचीच्या माध्यमातून माहिती जमा करून माहितीचे तक्ते, आलेख, सांख्यिकीय
साधनाचा उपयोग करून विश्लेषण केल्याचे सांगितले.
सदरील मौखिकीचे अध्यक्ष म्हणून डॉ सुनिल नरवडे, प्रोफेसर, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, तसेच बहिस्थ:
परीक्षक म्हणून डॉ. बाळासाहेब पाटील, प्रोफेसर, सी. के.
ठाकूर महाविद्यालय, पनवेल, नवी मुंबई आणि मार्गदर्शक प्रा. डॉ.
दीपक एम. भारती, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई
आणि प्रमुख
उपस्थिती मध्ये मा.
प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, प्रोफेसर
डॉ. चंद्रकांत कोकाटे, प्राचार्य डॉ. संग्राम मोरे( भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी), डॉ.
मुंजाभाऊ धोंडगे ( अधिसभा
सदस्य डॉ. बा. आं.
म. वि. छ. संभाजीनगर), डॉ. गोविंद बावस्कर (बलभीम महाविद्यालय बीड), डॉ. दशरथ
कांबळे (भगतसिंग महाविद्यालय किल्लारी), डॉ . सुरेश खोंड (शरदचंद्र महाविद्यालय शिरढोण), डॉ. नंदकिशोर
चीताडे, डॉ. अरविंद घोडके, डॉ. अहिल्या बरुरे, डॉ. धनंजय
खेबडे, डॉ . सुनील भोसले, डॉ. रुपेश देशमुख, डॉ. रोहिणी
खंदारे, प्रा. रोहित पाटील, डॉ. पद्मजा कुलकर्णी, डॉ. ज्ञानदेव
रावूत सर, प्रा. कावळे आदी सर्व प्राध्यापक व ज्योती साखरे, आनंद मैंद, अविनाश फुके
संशोधक विद्यार्थी तसेच अनिकेत ढोपे, पीएच. डी . विभागातील श्री शिवाजी मोहिते यांच्यासह अनेक संशोधक व प्राध्यापक ऑनलाईन उपस्थित राहिले. आणि खुली
मौखिक चाचणी यशस्वीरीत्या संपन्न झाली.
यशस्वी मौखिक चाचणी नंतर श्री गोविंद रामराव काळे
यांचा अर्थशास्त्र
संशोधन केंद्र व महाविद्यालयाच्या वतीने मा. प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या
हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. मुकुंद राजपंखे, डॉ. दिलीप
भिसे, डॉ. अनंत मरकाळे, डॉ. संजय सुरेवाड, डॉ. इंद्रजित
भगत, डॉ. भारत पल्लेवाड, डॉ . प्रकाश लोखंडे, डॉ. राजाभाऊ
भगत, डॉ. राठोड, डॉ. मनोरमा पवार, प्रा. नवीन
चव्हाण, प्रा. कांबळे, प्रा. गोरे, प्रा. सुशीलकुमार आचार्य, डॉ. सुनील
शिंदे, प्रा. शैलेश जाधव, प्रा. कोळेकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते
online
viva- छायाचित्र