Total Pageviews

Wednesday, April 9, 2025

उन्नत भारत अभियान अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा स्टार्टअप महाकुंभ, नवी दिल्ली येथे सहभाग:

 

उन्नत भारत अभियान अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा स्टार्टअप महाकुंभ, नवी दिल्ली  येथे सहभाग:



मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, उन्नत भारत अभियान कक्ष अंतर्गत महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने उन्नत भारत अभियान अंतर्गत दिनांक 3 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान दिल्ली येथे संपन्न झालेल्या (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ) स्टार्टअप महाकुंभ साठी महाविद्यालयातील दोन विद्यार्थी  हनुमंत मानिक मंदे आणि अशोक श्रीहरी तंबूड  यांनी  विद्यापीठाच्या संघामध्ये सदस्य म्हणून स्टार्टअप महाकुंभ मध्ये यशस्वी सहभाग नोंदवला. या दोन्ही विद्यार्थ्यांनी दि.०3  एप्रिल ते ०5 एप्रिल  या स्टार्टअप महाकुंभ कार्यक्रमांमध्ये अतिशय उत्साहपूर्वक आणि यशस्वीरित्या  सहभाग  घेवून देशभरातून आलेल्या विद्यापीठ संघासोबत आपल्या विद्यापीठ संघाची वेगळी ओळख निर्माण करून दिली. महाविद्यालयाच्या वतीने दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या हस्ते  विधार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी  उपप्राचार्य डॉ.  रमेश शिंदे ,उन्नत भारत अभियान समन्वयक डॉ. दीपक भारती, सह- समन्वयक डॉ. अहिल्या बरुरे यांची उपस्थिती होती.  विषय तज्ञ  डॉ. अरविंद घोडके, डॉ. अनंत मरकाळे  यांनी देखील या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सदरील उपक्रम प्रेरणादायी ठरेल असे मत प्राचार्य शिवदास शिरसाठ यांनी व्यक्त केले. या दोन्ही विद्यार्थ्यांनी या प्रसंगी स्टार्टअप महाकुंभ मधून आलेले अनुभव व ग्रामीण भागातून होत असलेल्या देशभरातील स्टार्ट अप बद्दलचे दिल्ली महाकुंभ मधील अनुभव सर्वांसमोर मांडले. याबद्दल स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी या सर्वच पातळीवर  दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन  व कौतुक होत आहे.


छायाचित्रे 










वर्तमानपत्रातील बातमी 







श्रीमती ज्योती जालंदर साखरे यांची अर्थशास्त्र पीएच. डी. ( विद्यावाचस्पती ) साठीची खुली मौखिक चाचणी संपन्न: २७/०६/२०२५

  श्री मती ज्योती जालंदर साखरे यांची अर्थशास्त्र पीएच. डी. ( विद्यावाचस्पती ) साठीची खुली मौखिक चाचणी संपन्न मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ सं...