Total Pageviews

Thursday, March 19, 2026

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न: १८ /०३/२०२६

 


मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,

अर्थशास्त्र  विभाग 

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 

Under MOU Activities

(National Level Online Workshop)

 राष्ट्रीय  कार्यशाळा   



अर्थशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न:

  अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये  दि.18 मार्च 2026 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाईअर्थशास्त्र विभाग आणि राजश्री शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूरअर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने (MOUअंतर्गत) संशोधन पद्धती  या विषयावर एक दिवशीय ऑनलाइन राष्ट्रीय  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून राजश्री शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूर चे मा. प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे उपस्थित  होते, तर,  उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे  मा. प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट यांनी विध्यार्थी व प्राध्यापक यांच्या दृष्टीने  संशोधन पद्धती अतिशय महत्वाची असून शैक्षणिक धोरण २०२० नुसार सर्वच स्तरावरील विध्यार्थ्यांना संशोधन पद्धती उपयोगाची असून सदरील कार्यशाळा विध्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर सामाजिक प्रश्न योग्य पद्धतीने सोडविण्यासाठी योग्य संशोधन पद्धती संशोधकाकडून उपयोगात आणली तरच अपेक्षित निकाल मिळू शकतो असे मत व्यक्त केले.  

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक (अर्थशास्त्र विभाग प्रमुखयशवंतराव चव्हाण महाविद्यालयअंबाजोगाई) डॉ. दीपक भारती यांनी केले व कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू व आवश्यकता सर्वांसमोर मांडली.  कार्यशाळेचे  बिजभाषक व साधनव्यक्ती म्हणून   डॉ. मनोहर बी. येरकलवार (इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विद्यापीठ, अमरकंटक, मध्य प्रदेश  ) यांचा परिचय डॉ. बी. पी. गाडेकर (अर्थशास्त्र विभाग प्रमुखराजर्षी शाहू महाविद्यालय, स्वायत्त, लातूर) यांनी करून दिला. कार्यशाळेचे मार्गदर्शक डॉ. मनोहर बी. येरकलवार यांनी "संशोधन पद्धती "या विषयावर बोलताना संशोधन पद्धतीचा अर्थ, व्याख्या, संशोधनाची उद्दिष्ट्ये, संशोधनाचे प्रकार ,संशोधन प्रक्रिया (Steps): समस्या निश्चिती, साहित्याचे पुनरावलोकन, गृहीतके (Hypothesis) मांडणे, संशोधन आराखडा (Research Design), नमुना निवड (Sampling), माहिती संकलन (Data Collection), विश्लेषण आणि अहवाल लेखन, संदर्भ सूची या सर्व बाबतीत अतिशय सखोल असे मार्गदर्शन केले.  

    कार्यशाळेचे सूत्र संचलन प्रा. जे. एच. गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आर. एन. जाधव (अर्थशास्त्र विभागराजश्री शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूर) यांनी केले.   कार्यशाळेसाठी राज्यातील विविध महाविद्यालयातील  प्राध्यापकसंशोधक विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी Microsoft  Teams  या माध्यमातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील  कार्यशाळेसाठी १६२ संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी online नोंदणी केली तर १०० पेक्षा अधिक विध्यार्थी दोन्ही महाविद्यालयातून online / offline उपस्थित होते. सदरील कार्यशाळा आयोजित करण्यासाठी दोन्ही महाविद्यालयातील अर्थशास्त्र  विभागातील सर्व प्राध्यापक (डॉ. मनोरमा पवार, प्रा. आरती मुळे, प्रा. एन. आर. वाळके ) व तांत्रिक बाजू सांभाळणारे  कर्मचारी  यांचे विशेष सहकार्य  लाभले.

कार्यशाळेची छायाचित्र 

















































Monday, January 26, 2026

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांकडून उन्नत भारत अभियानांतर्गत दत्तक गाव जोगाईवाडी येथे प्रजासत्ताक दिन साजरा: २६ जानेवारी २०२६

 


मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयअंबाजोगाई,

उन्नत भारत अभियान कक्ष 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांकडून उन्नत भारत अभियानांतर्गत दत्तक गाव जोगाईवाडी येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथील उन्नत भारत अभियान कक्षाचे सदस्य आणि स्वयंसेवक यांनी  तालुक्यातील मौजे  जोगाईवाडी येथे जावून ग्रामस्थासोबत व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला.  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा जोगाईवाडी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उन्नत भारत अभियान कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. दीपक भारतीसह-समन्वयक प्रा. डॉ. अहिल्या बरुरेडॉ. अरविंद घोडकेडॉ. अनंत मरकाळेडॉ . रोहिणी खंदारे, प्रा. सुशीलकुमार आचार्य  यांनी राबविला व कु. गायत्री तुरे, कु. सानिया शेख, कु. प्रिया कांबळे, कु. धनश्री भिसे. कु.अश्विनी कांबळे, कु. माया मरकड, कु. पल्लवी, कु. सागर मिरासे, कु. पूर्वा साळुंके  या विध्यार्थीनिसह  चि. आर्यन बलाढ्ये, चि. जीशान शेख व चि. संकेत पवार आदी विद्यार्थिनी सक्रीय सहभाग नोंदवला.  स्वयंसेवकांनी गावातील लोकांच्या स्वच्छतेविषयीच्या अडी अडचणी जाणून घेतल्या व गावाच्या विकास योजनांबाबत ग्रामसभेच्या माध्यमातून माहिती घेतली. प्रारंभी ग्रामपंचायतीच्या वतीने गावच्या  सरपंच मा. सौ. मनीषाताई  दोडतले  यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन पार पडले. या कार्यक्रमास उपसरपंच श्री सुनील बाबुराव मस्केसर्व ग्रामपंचायत सदस्य मा, . श्री बाळासाहेब दोडतले, ग्राम विकास अधिकारी श्री. बी. डी. जांभळे,  मुख्याध्यापक  श्री जे. डी.  सावंत, श्री बालाजी नरहारी घाडगे, श्री दीपक घाडगे,  शाळेतील सर्व शिक्षक व गावातील लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.  हा कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत जोगाईवाडी , जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयजोगाईवाडी  येथील सर्व शिक्षक वृंदग्रामस्थ या सर्वांचे सहकार्य लाभले.



प्रमुख छायाचित्रे 























अर्थशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न: १८ /०३/२०२६

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र  विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Under MOU A...