Total Pageviews

Wednesday, February 1, 2023

मोबाइल...इंटरनेट आणि डेटा याचा योग्य वापर- विचार व कृती करण्याची वेळ


विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा मानवाच्या एकूणच विकासात खूप मोलाचा वाटा असला तरी देखील, याच विज्ञान व तंत्रज्ञान युगात इंटरनेटचा प्रसार व त्याचा उपयोग करण्यासाठी लागणारी  शिदोरी म्हणजे डेटा होय.  डेटा खरेदी करून तो संपवणे ही सवय  कंपन्यांनी त्यांच्या फायद्यासाठी सर्वच वयोगटाील लोकांना  लावली. हा डेटा कसा संपवायचा याबाबत कोणाचेच नियंत्रण मात्र दिसत नाही.  ही सवय हळू हळू स्पर्धेत  ( विशेषतः तरुण वयोगटात) रूपांतरित होत आहे. ज्याचे अनेक दुष्परिणाम विद्यमान पिढीला भोगावे लागत आहेत. भविष्यात या परिणामांची दाहकता अजून वाढू शकते.  वेळीच याबाबत गांभीर्याने विचार व  कृती सर्वच पातळ्यांवर होणे गरजेचे वाटते.
सर्वच प्रश्न हे सरकारने सोडवले पाहिजेत या मानसिकतेतून बाहेर पडून या प्रश्नाचा विचार प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर करण्याची ही वेळ आहे. विज्ञान व तंत्रज्ञान आपल्या हिताचे नक्कीच आहे,  पण आपले हित कशात आहे व कशात नाही याची योग्य निवड देखील तितकीच महत्वाची ठरते.


 कृती व विचारार्थ.....

                                                 दीपक एम. भारती


No comments:

Post a Comment

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...