Total Pageviews

Tuesday, December 10, 2024

संशोधन प्रबंध सादर करण्यापूर्वीची पूर्व - मौखिकी (Pre- Viva) संपन्न- ०९/१२/२०२४

 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,

अर्थशास्त्र विभाग व अर्थशास्त्र संशोधन केंद्र

संशोधन प्रबंध  सादर करण्यापूर्वीची पूर्व - मौखिकी (Pre- Viva)  संपन्न 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठछत्रपती संभाजीनगर, अर्थशास्त्र संशोधन केंद्र,  यशवंतराव चव्हाण महाविद्यालयअंबाजोगाई येथे मानव्यविद्या शाखेअंतर्गत अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती(पीएच.डी)पदवीसाठी संशोधन प्रबंध सादर करण्यापूर्वीची संशोधक विद्यार्थीनी श्रीमती साखरे ज्योती जालंधर  यांची पूर्व मौखिकी  अध्यक्ष  प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, मार्गदर्शक डॉ. दीपक एम. भारती, बहिस्थ पर्यवेक्षक व विषय  तज्ञ  डॉ. नंदकिशोर चिताडे व उपस्थित  सर्व प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत दिनांक ०९ डिसेंबर २०२४  वार सोमवार रोजी वेळ १२.१५  वाजता यशस्वीरीत्या संपन्न झाली .संशोधक श्रीमती साखरे ज्योती जालंधर यांनी अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवीसाठी "महाराष्ट्रातील मानवी भांडवलाच्या गुणात्मकतेचा अभ्यास " या विषयावरील आपल्या शोध प्रबंधाचा अंतिम गोषवारा सर्व उपस्थितांसमोर PPT च्या माध्यमातून  सादर केला.  सादरीकरणानंतर  उपस्थित संशोधक व प्राध्यापक यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. प्रस्तुत पूर्व मौखिकी साठी उपस्थितांमध्ये डॉ. अरविंद घोडके, डॉ.  प्रकाश लोखंडे,  डॉ. अहिल्या बरुरे, डॉ. दिलीप भिसे, प्रा. रोहित पाटील,  डॉ. मनोरमा पवार. डॉ. रोहिणी खंदारे, प्रा. चाटे शिवकन्या, प्रा. सुशीलकुमार आचार्य, डॉ. मोरे डी. एस., प्रा. गणेश कोळेकर, प्रा . लाखे पी. सी., प्रा. व्ह्न्डकर डी. एस., प्रा. पवार एस. वाय., प्रा. नागरगोजे व्ही. टी., प्रा. सोमवंशी व्ही. टी., प्रा. कोपले टी. ए. डॉ. राठोड एस.एन., संशोधक विद्यार्थी  आनंद मैंद  व इतर संशोधक तसेच प्राध्यापक व विद्यार्थी   या सर्वांचा समावेश होता.

प्रातिनिधिक छायाचित्रे 

 
संशोधकाद्वारे   PPT  च्या माध्यमातून  सादरीकरण

पूर्व मौखीकी (Pre- Viva) चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ
 

(Pre- Viva) साठीचे  विषय तज्ञ डॉ. नंदकिशोर चिताडे


संशोधन मार्गदर्शक डॉ. दीपक एम. भारती 

 (Pre- Viva)  पूर्व मौखीकीसाठी उपस्थित संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी 














No comments:

Post a Comment

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...