Total Pageviews

Tuesday, September 30, 2025

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात समान संधी केंद्राचे उद्घाटन संपन्न: २९/०९/२०२५

 




                       मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयअंबाजोगाई,

  समान संधी केंद्र 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात समान संधी केंद्राचे उद्घाटन संपन्न: 



दिनांक 29.09.2025, वार सोमवार रोजी म. शि. प्र. मंडळ संचलित  यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे मा. प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली  समान संधी केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून बोलताना  मा. श्री अशोक हातागळे, संचालक, ग्राम ऊर्जा फाउंडेशन  यांनी सध्यस्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वेगवेगळ्या समाज घटकांसाठी सुरु असलेल्या विविध  योजनांची व कौशल्यावर आधारित केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची  सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.  तसेच ग्राम ऊर्जा फाउंडेशन च्या माध्यमातून समाजातील वंचित विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांना सविस्तर देवून,  NGO च्या माध्यमातून आम्ही शिक्षण, रोजगार व शासकीय योजनांची माहिती प्राथमिक स्तरापर्यंत दत्तक गावे निवडून काम करतो असे सांगितले.  एक चांगला विध्यार्थी बनत असतानाच राष्ट्राचा एक चांगला नागरिक बनण्यासाठी वेगवेगळ्या संधी तुमच्यापर्यंत पोहोचविन्याच्या  माध्यमातून समान संधी केंद्र आपल्यासाठी सातत्याने कार्यरत असणार आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील विध्यार्थी मोठ्या संख्येने या सर्व संधींचा लाभ घेवून भविष्यात राष्ट्राचे चांगले नागरिक बनतील असा विश्वास व्यक्त केला. ग्राम ऊर्जा फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष मा. दादासाहेब गायकवाड यांनी समाजामधील अविकसित घटकांचा विकास होण्यासाठी ग्राम ऊर्जा फाउंडेशन कार्यरत असल्याचे स्पष्ट केले तसेच समाजाची खरी प्रगती ही समाजातील प्रत्येक घटक जेव्हा प्रगतशील होईल तेव्हाच होत असते कोणताही घटक अविकसित राहू नये यासाठी ग्राम उर्जा  फाउंडेशन प्रयत्न करते असे प्रतिपादन करून महाविद्यालयाचे समान संधी केंद्र आपल्याला माणसाकडे माणूस म्हणून बघायला शिकवेल  अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोप करताना मा. प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ म्हणाले की,  समान संधीची सुरुवात कुटुंबापासून सुरू होते त्याचे संस्कार कुटुंबापासूनच केले पाहिजेत  तसेच विध्यार्थ्यांना महाविद्यालय सर्वच पातळीवर वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते , त्या संधींपासून कोणीही वंचित राहता कामा नये. समान संधी केंद्राच्या माध्यमातून या वेगवेगळ्या  संधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा या केंद्राचा प्रयत्न राहील.कार्यक्रमाच्या प्रारंभी समान संधी केंद्राचे समन्वयक डॉ. दीपक भारती यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या अयोजनामागची भूमिका व्यक्त केली तसेच शासनाने सुरु केलेल्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजनांची व कौशल्य विकासाच्या संदर्भात  हे समान संधी केंद्र कार्य करेल  असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे  सूत्र संचालन संशोधन छात्र श्री आनंद मैंद यांनी केले यांनी  केले तर आभार प्रदर्शन समान संधी केंद्राचे सदस्य डॉ. रोहिणी खंदारे यांनी  केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील  डॉ. अहिल्या बरुरे, डॉ. मुकुंद राजपंखे , डॉ. अरविंद घोडके, डॉ. दिलीप भिसे, डॉ. अनंत मरकाळे, डॉ. रुपेश देशमुख, डॉ. मनोरमा पवार, तसेच सर्व प्राध्यापक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमाची निवडक छायाचित्र 















































वर्तमानपत्रातील बातमी (Newspaper Clippings)







अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar संपन्न : दिनांक २४ सप्टेंबर २०२५

  



 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयअंबाजोगाई,

  अर्थशास्त्र विभाग

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s  Seminar संपन्न  

दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बी. ए. च्या प्रथमद्वितीय व तृतीय वर्षातील  विध्यार्थ्यांचे सेमिनार आयोजित केले होते. या सेमिनार मध्ये विध्यार्थ्यानी उस्फुर्तपणे सहभाग घेवून विविध चालू आर्थिक घडामोडींवर आपले विचार मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. 

खालील महत्वाच्या विषयांवर विध्यार्थ्यानी आपले सेमिनार  सादर केले व याच विषयांच्या बाबत समूह चर्चा देखील घडवून आणण्यात आली.  

१. भारतीय अर्थव्यवस्था    

२. सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र  

३. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था  

४. बँकिंग व वित्त 

५. विकासाचे अर्थशास्त्र  

या प्रसंगी विभागातील प्राध्यापक, संशोधक विध्यार्थी  व विभाग प्रमुख डॉ दीपक भारती यांची उपस्थिती होती.

 निवडक छायाचित्रे

























यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात समान संधी केंद्राचे उद्घाटन संपन्न: २९/०९/२०२५

                         मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ,  अंबाजोगाई ,   समान संधी केंद्र  यशवंतराव चव्हा...