Total Pageviews

Sunday, March 29, 2026

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न:

 

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,

अर्थशास्त्र  विभाग 

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 

Under MOU Activities

(National Level Online Workshop)

 राष्ट्रीय  कार्यशाळा  

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न:

  अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये  दि. 28 मार्च 2026 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग आणि राजश्री शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूर, अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने (MOUअंतर्गत) "केंद्रीय अर्थसंकल्प 2026 -27"  या विषयावर एक दिवशीय ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून राजश्री शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूर चे मा. प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे उपस्थित  होते, त्यांनी आपल्या उद्घाटकीय मनोगतामध्ये देशाच्या अर्थसंकल्पामधून विविध क्षेत्रांसाठी केलेल्या तरतुदींचा उल्लेख करून शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत केलेली वाढीव अर्थसंकल्पीय तरतूद अधिक महत्वाची आहे असे प्रतिपादन केले  तरअध्यक्ष म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे  मा. प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत मांडताना त्यांनी अर्थसंकल्प देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी कसा महत्वाचा आहे हे सांगून  कृषी आणि ग्रामीण विकासयुवकांसाठीच्या योजना याबाबत अर्थसंकल्पात केलेली तरतूद महत्वाची ठरते असे सांगून अर्थसंकल्प हा  देशाची दशा आणि दिशा निश्चित करणारा ठरत असतो असे प्रतिपादन केले.   

                    कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख  डॉ. दीपक भारती यांनी केले व कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू व आवश्यकता सर्वांसमोर मांडली. त्यानंतर डॉ. बी. पी. गाडेकर (अर्थशास्त्र विभाग प्रमुख, राजर्षी शाहू महाविद्यालय, स्वायत्त, लातूर) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यशाळेचे  बिजभाषक व साधनव्यक्ती म्हणून डॉ. शंकर कडेकर (सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, लातूर , महाराष्ट्र  ) यांचा परिचय डॉ. रोहिणी खंदारे यांनी करून दिला. कार्यशाळेचे बिजभाषक व साधनव्यक्ती  डॉ. शंकर कडेकर  यांनी "केंद्रीय अर्थसंकल्प 2026 -27" या विषयावर बोलताना सविस्तरपणे अर्थसंकल्पामधील तरतुदींचा क्षेत्रानिहाय आढावा घेवून विकसित भारत 2047 या  उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने  केंद्रीय अर्थसंकल्प कसा सहाय्यभूत आहे हे सविस्तरपणे मांडलेशिवाय अर्थसंकल्पात दर्शवलेला 2026-27 या  वित्तीय वर्षातील एकूण खर्च, एकूण प्राप्ती व राजकोषीय तुट या बाबींवर देखील सखोल प्रकाश टाकून अर्थसंकल्पातील तरतुदी आशावादी असल्या तरी प्रत्यक्ष प्रभावी अंमलबजावणी हीच आपल्या देशाला विकसित भारत 2047 या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने घेवून जावू शकते असे मत व्यक्त केले.

त्यानंतर सदरील कार्यशाळेत विध्यार्थी व संशोधक विध्यार्थ्यानी संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने असलेल्या  आपल्या शंका व प्रश्न विचारले, ज्याबाबतीत सविस्तर चर्चा कार्यशाळेत घडून आली.

    कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. मनोरमा पवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. जे. एच. गायकवाड  यांनी केले.  कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातील  प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी , पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी zoom  च्या माध्यमातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील  कार्यशाळेसाठी 132 संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी online नोंदणी केली तर १०० पेक्षा अधिक विध्यार्थी दोन्ही महाविद्यालयातून online / offline उपस्थित होते. सदरील कार्यशाळा आयोजित करण्यासाठी दोन्ही महाविद्यालयातील अर्थशास्त्र  विभागातील सर्व प्राध्यापक व तांत्रिक बाजू सांभाळणारे  कर्मचारी  श्री अली शेखश्री असेफ शेख  यांचे विशेष सहकार्य  लाभले.

कार्यशाळेची छायाचित्र 













































वर्तमानपत्रातील बातमी 



No comments:

Post a Comment

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने पदव्युत्तर वर्गातील Student`s Seminar संपन्न : दिनांक ०४ एप्रिल २०२६

                                                   मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ,  अंबाजोगाई ,   अर्थशा...