यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सामाजिक
शास्त्रे मंडळ उद्घाटन सोहळा संपन्न:
(सृजक
म्हणून भारतीय शेतकरी आणि स्त्रिया
दोघेही वर्तमान स्थितीमध्ये
संकटात: मा. अमर हबीब)
दिनांक २६.१०.२०२३,
वार गुरुवार रोजी म. शि. प्र. मंडळाचे
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या
अध्यक्षतेखाली सामाजिक शास्त्रे उद्घाटन
सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून बोलताना ज्येष्ठ
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मा. अमर हबीब यांनी आज भारतीय समाजात सृजक म्हणून
महत्वाची भूमिका पार पाडणारे शेतकरी व स्त्रिया हे दोनही घटक सद्यवर्तमानात संकटात
आहेत, अशी भावना व्यक्त केली. या दोघांच्या व्यथा समान आहेत. समाजरूपी जग
टिकवून ठेवायचे असेल तर या दोन घटकांच्या बाबतीत समाजातील प्रत्येकाने आपली
जबाबदारी न्याय पद्धतीने पार पाडावी. अन्यथा
समाज आणि पर्यायाने संपूर्ण जग संकटात आल्याशिवाय राहणार नाही. तसेच
सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांनी वर्तमान स्थितीचा अभ्यास केला
पाहिजे. परिस्थितीनुरूप प्रश्न पडणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आपल्याला किती
व्यापक प्रश्न पडतात. जसे प्रश्न पडत जातील तसा तुमचा आणि तुमच्या विचारांचा विकास
होत जाईल व त्यातून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत मार्गक्रमण करू शकाल असे मत
व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ
म्हणाले की, माणूस म्हणून जन्म घेणे आपल्या हाती नसले तरी माणूस म्हणून जी
कर्तव्ये आपल्याला पार पाडावयाची आहेत ती कर्तव्ये पार पाडणे आपल्या नक्कीच हाती
आहे. सामाजिक शास्त्र ही विध्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाण निर्माण करतात
त्या माध्यमातून माणूस म्हणून आपली कर्तव्ये विद्यार्थ्यानी व्यवस्थित पार पाडावीत
असे प्रतिपादन केले. या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.पी.के.जाधव व
सामाजिक शास्त्रे मंडळाचे समन्वयक डॉ.दीपक भारती यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात
प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
तद्नंतर सामाजिक शास्त्रे मंडळाचे समन्वयक
डॉ. दीपक भारती यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या अयोजानामागची भूमिका व्यक्त
केली. या कार्यक्रमात सामाजिक शास्त्रेमंडळ विद्यार्थी पदाधिकारी यांचे स्वागत
करण्यात आले. कु. वैष्णवी दुभाशे व कु. प्रीती पवार या विध्यार्थीनिनी आपले मनोगत
व्यक्त करून सामाजिक शास्त्रे विद्यार्थी म्हणून आमच्या व्यक्तिमत्व विकासास कसे
मदत करतात, हे अभिव्यक्त केले. त्यानंतर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, लोकप्रशासन, भूगोल, गृहशास्त्र
या सर्व विषयांच्या विद्यार्थांनी तयार केलेल्या भित्ती पत्रकाचे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कु.अनिता वानोळे या विद्यार्थीनिने स्वागत गीत
सादर केले, सोहळ्याचे सूत्र संचालन कु श्वेता राजेश गोरे व कु.भारती भागवत इंगळे
या विध्यार्थीनिने केले तर आभार प्रदर्शन
सामाजिक शास्त्रे मंडळाची अध्यक्ष कु. पूजा चव्हाण या विद्यार्थीनिने केले.या
कार्यक्रमास महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे विभागातील डॉ. सुरेवाड संजय, डॉ. लोखंडे
प्रकाश , सर्व प्राध्यापक व
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्तमान पत्रांनी घेतलेली कार्यक्रमाची नोंद
कार्यक्रमाची निवडक छायाचित्र
सामाजिक शास्त्रे मंडळ विद्यार्थी पदाधिकारी व सर्व सामाजिक शास्त्रे विषयाचे प्राध्यापक
सामाजिक शास्त्रे मंडळ विद्यार्थी पदाधिकारी व सर्व सामाजिक शास्त्रे विषयाचे प्राध्यापक
उद्घाटक मा. अमीर हबीब यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ
सामाजिक शास्त्रे विषयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
सामाजिक शास्त्रे मंडळ विद्यार्थी पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
मनोगत व्यक्त करताना कु. वैष्णवी दुभाषे
मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनी प्रीती पवार
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ
प्रास्ताविक- डॉ. दीपक भारती, समन्वयक, सामाजिक शास्त्रे मंडळ
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. अमर हबीब