Total Pageviews

Tuesday, January 16, 2024

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात समान संधी केंद्राचे उद्घाटन संपन्न: ०५.०१.२०२४

 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात समान संधी केंद्राचे उद्घाटन संपन्न: 

उद्घाटक डॉ. जी. एस. मोटे

दिनांक ०५.०१.२०२४, वार शुक्रवार रोजी म. शि. प्र. मंडळ संचलित  यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली  समान संधी केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. जी. एस. मोटे यांनी सध्यस्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या समाज घटकांसाठी सुरु असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांची व कौशल्यावर आधारित केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची  सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. एक चांगला विध्यार्थी बनत असतानाच राष्ट्राचा एक चांगला नागरिक बनण्यासाठी वेगवेगळ्या संधी तुमच्यापर्यंत पोहोचविन्याच्या  माध्यमातून समान संधी केंद्र आपल्यासाठी सातत्याने कार्यरत असणार आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील विध्यार्थी मोठ्या संख्येने या सर्व संधींचा लाभ घेवून भविष्यात राष्ट्राचे चांगले नागरिक बनतील असा विश्वास व्यक्त केला. 

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ म्हणाले की, महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना सर्वच पातळीवर वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत असतात, त्या संधींपासून कोणीही वंचित राहता कामा नये. समान संधी केंद्राच्या माध्यमातून या वेगवेगळ्या  संधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा या केंद्राचा प्रयत्न राहील. भारतीय राज्यघटनेने आपल्या दिलेल्या समानता व न्याय  या तत्वानुसार समाजातील जे घटक विकासाच्या प्रवाहामध्ये अद्याप मागे आहेत, अशा वर्गासाठी शासनाने सुरु केलेल्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजनांची व कौशल्य विकासाच्या योजनांची माहिती व त्याबाबतचे मार्गदर्शन या केंद्राच्या माध्यमातून मिळेल. या मार्गदर्शनाचा लाभ घेवून विद्यार्थी  आपले शैक्षणिक करिअर नक्कीच  उचांवतील  अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी समान संधी केंद्राचे समन्वयक डॉ. दीपक भारती यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या अयोजानामागची भूमिका व्यक्त केली.  कार्यक्रमाचे  सूत्र संचालन प्रा. सुशीलकुमार आचार्य  यांनी  केले तर आभार प्रदर्शन समान संधी केंद्राचे सदस्य डॉ. प्रकाश लोखंडे यांनी  केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ. अरविंद घोडके, डॉ. अहिल्या बरुरे, डॉ. दिलीप भिसे, डॉ. अनंत मरकाळे, डॉ. रुपेश देशमुख, डॉ. रोहिणी खंदारे, डॉ. जाधव बी. एस., संशोधन छात्र  श्री आनंद मैंद  यांच्यासह  सर्व प्राध्यापक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमाची निवडक छायाचित्र 









वर्तमानपत्रातील बातमी 



No comments:

Post a Comment

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...