सामाजिक शास्रातील संशोधन हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे: डॉ. दिपक भारती
लातूर (प्रतिनिधी) राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर (स्वायत्त ) येथील अर्थशास्त्र विभागाद्वारे संशोधन प्रकल्प लेखन या विषयांवर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेस साधन व्यक्ती म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे (अंबाजोगाई) अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रोफेसर डॉ. दिपक भारती हे उपस्थित होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, अर्थशास्त्रीय संशोधन हा सामाजिक शास्त्राचा एक महत्वाचा विषय होय. समाजाकडे जागरूकतेने पाहणाऱ्या व्यक्तीला समाधान मिळवून देणारी बाब म्हणजे संशोधन होय. समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे संशोधन करण्याची दृष्टीे असली पाहिजे, कारण संशोधन हे समाज व देशाच्या विकासाचे इंजिन आहे.
पुढे ते म्हणाले की, नवीन तथ्ये मांडायचे असतील तर जून्या तथ्यांचे परीक्षण होणे आवश्यक आहे. समाजात निर्माण होणा-या समस्येचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचवणे काळाची गरज आहे. संशोधनातून काढलेले निष्कर्ष हे रंजक नसून त्यात सत्यता व निरपेक्षता असली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. पी. गाडेकर यांनी केले. संशोधन हे तरूण वर्गांनी केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. रासुरे गायत्री यांनी केले तर आभार प्रदर्शन शिंदे पुनम यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा. जीवन गायकवाड, प्रा. रुपाली जाधव, प्रा. रहिम शेख व सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयांचे पदवी व पदव्युत्तर वर्गातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्तमानपत्रातील बातम्या
No comments:
Post a Comment