Total Pageviews

Saturday, January 20, 2024

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न:२०.०१.२०२४

 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व संशोधन  

केंद्राच्या वतीने  एक दिवसीय राज्यस्तरीय  कार्यशाळा संपन्न:






अंबाजोगाई :  दिनांक २०.०१.२०२४ रोजी म. शि. प्र. मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने ‘सामाजिक शास्त्र संशोधन: मुलतत्वे व पद्धती’  या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा ऑनलाईन झूमवर आयोजित करण्यात आली. कार्यशाळेसाठी  बीजभाषक व साधन व्यक्ती म्हणून डॉ. घनशाम  येळणे  (प्राध्यापक व संचालक, सामाजिक शास्त्रे संकुल, स्वामी  रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) यांनी बीजभाषनातून सामाजिक शास्त्रे संशोधन हे मानवी समाजाचा, मानवी वर्तवणुकीचा  संशोधनात्मक अभ्यास करण्याचे प्रभावी माध्यम असून सामाजिक संशोधन पद्धतीचा प्रामाणिक उपयोग संशोधकांनी केला पाहिजे असे प्रतिपादन केले. दुसऱ्या सत्रात साधनव्यक्ती म्हणून डॉ. सुभाष कोंबडे  (अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांची ऑनलाईन उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना डॉ. सुभाष कोंबडे  यांनी सामाजिक शास्त्रीय संशोधन करत असताना प्राथमिक माहिती संकलनातील विविध स्त्रोतांचा उपयोग करताना नमुना निवड किती महत्वपूर्ण असते. नमुना निवडत असताना संशोधकांनी कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर सादरीकरण केले. तर तिसऱ्या सत्रात साधनव्यक्ती म्हणून डॉ. कृतिका खंदारे (सहयोगी प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) या उपस्थित होत्या. त्यांनी या सत्रात संशोधन तंत्रे आणि त्याचे उपयोजन या विषयावर आपले सादरीकरण केले. त्यांनी सामाजिक शास्त्रातील संशोधकांनी बदललेल्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलून आंतरविद्याशाखीय, बहुविद्याशाखीय संशोधनात सहभाग घ्यावा व आपले संशोधन कसे परिपूर्ण करता येवू शकते याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  

कार्यशाळेच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त करून अशा कार्यशाळेच्या माध्यमातून सामाजिक शास्त्रीय संशोधन करणाऱ्या संशोधकांना संशोधनाची योग्य दिशा मिळण्यास मदत होईल व अशा कार्यशाळा वेळोवेळी महाविद्यालय आयोजित करत राहील असा विश्वास सर्व सहभागी प्राध्यापक व संशोधकांना दिला. 

 या  कार्यशाळेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दीपक भारती यांनी केले व कार्यशाळा आयोजनामागची भूमिका कार्यशाळेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सर्वांसमोर ठेवली. कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले बीजभाषक व साधनव्यक्ती यांचा परिचय प्रा. शैलेश जाधव व प्रा. सुशीलकुमार आचार्य यांनी करून दिला तर डॉ. मनोरमा पवार यांनी आभार मानले.  या कार्यशाळेस उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, प्रा. पी. के. जाधव, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र तसेच इंग्रजी संशोधन केंद्रातील सर्व संशोधक, सर्व प्राध्यापक तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातील व विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी, संशोधन मार्गदर्शक, प्राध्यापक मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभागी होते.  



कार्यशाळा youtube लिंक

कार्यशाळेतील निवडक छायाचित्र 





ऑनलाईन सहभागी संशोधक व प्राध्यापक 



बीज भाषक  डॉ. घनशाम येळणे, (प्राध्यापक व संचालक, सामाजिक शास्त्रे संकुल, स्वामी  रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)  




साधनव्यक्ती  डॉ. सुभाष कोंबडे  (अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)



डॉ. कृतिका खंदारे (सहयोगी प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) 



डॉ. दीपक भारती , कार्यशाळा समन्वयक 



प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय 





वर्तमानपत्रातील बातमी  



No comments:

Post a Comment

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...