Total Pageviews

Tuesday, February 11, 2025

मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे ३७ वे राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न : दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५


गतकाळातला संपन्न आर्थिक महाराष्ट्र निर्माण करणे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे...

उद्घाटक डॉ. नीरज हातेकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ, स्कूल ऑफ डेव्हलपमेंट, अजीम प्रेमजी विद्यापीठ, बेंगलोर



अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये मराठवाडा अर्थशास्त्र परिषद व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने 37 व्या दोन दिवसीय मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेच्या राज्यस्तरीय  अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा दिनांक ०७ फेब्रुवारी २०२ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

अधिवेशन आयोजनापाठीमागील भूमिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी प्रास्ताविक रूपात मांडली, तर  मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा डॉ दिनकर टकले, यांनी मराठवाडा अर्थशास्त्र परिषद कार्याची ओळख करून देताना मराठवाड्यातील आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी, चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने ही परिषद कार्य करते. आर्थिक संशोधन वृत्तीचा विकास, आर्थिक प्रश्न, कृषी रोजगार, बेरोजगारी, औद्योगीकरण, आर्थिक स्थिती बाबत सविस्तर चर्चा, उकल करण्याचा उद्देशाने या परिषदेचे कार्य आहे,असे ते म्हणाले.

मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे उद्घाटक डॉ. नीरज हातेकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ, स्कूल ऑफ डेव्हलपमेंट अजीम प्रेमजी विद्यापीठ, बेंगलोर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी सखोल भाष्य केले. एकेकाळीचा संपन्न महाराष्ट्र आज आहे का हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी महाराष्ट्राची आर्थिक अधोगती हे भारतातील इतर राज्याच्या तुलनेत कमी होत जात आहे याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. ग्रामीण महाराष्ट्र बद्दल त्यांनी अधिक चिंता व्यक्त केली पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आपण देशामध्ये 27 व्या स्थानावर आहोत असे बाब आहे. भारताला विकसित राष्ट्र त्यासाठी सध्याचा दरडोई उत्पन्न दहापट वाढवणे आवश्यक आहे कृषी क्षेत्र मजबूत करणे गरजेचे आहे उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करणे आवश्यक आहे पर्यायाने रोजगार वाढविणे हे फार मोठे आव्हान भारतासमोर आहे, असे ते म्हणाले वास्तवाकडे वारे समोर येऊ दिली जात नाही हे प्रखर सत्य त्यांनी मांडले.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय सदस्य तथा अर्थशास्त्र अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील यांनी अशा परिषदा अभ्यासपूर्ण असतातच परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये मूलभूत गोष्टी लक्षात घेऊन अभ्यासक्रम लागू करणे आवश्यक आहे,असे ते म्हणाले.

 

उद्घाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप अधिवेशन अध्यक्ष मा. राम सोलंकर, उमरगा यांनी केला. भारतातील दारिद्र्य या संदर्भात त्यांनी सविस्तर विवेचन केले. दारिद्र्य निर्मूलन होण्यासाठी सातत्याने भारत देश प्रयत्न करत आहे परंतु यात समाधानकारक स्थिती दिसत नाही वरचेवर दारिद्र्याचे स्वरूप वाढत आहे, असे चिंताजनक सत्य त्यांनी मांडली आहे. ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामीण सुवर्ण जयंती योजना अशा योजना दारिद्र्य निर्मूलनासाठी निर्माण केल्या गेल्या आहेत, असे ते म्हणाले.

उद्घाटन सत्रानंतर डॉ. व्ही. व्ही.बोरकर व्याख्यानमाला पार पडली. प्रा डॉ अनिल वाव्हरे यांचे 'विकसित भारत @२०४७' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले. भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी रोजगार वाढ उत्पादन वाढ उद्योग वाढ या गोष्टी जोमाने करण्यासोबतच भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रचंड कार्य करावे लागेल असे म्हणाले.

भारतातील दारिद्र्य, आरोग्य, शैक्षणिक उपलब्धी व राहणीमान या विषयावर पहिले सत्र संपन्न झाले. सत्रध्यक्ष म्हणून डॉ मारोती तेगमपुरे,मराठवाड्यातील कृषी क्षेत्रावर हवामान बदलाचा झालेला परिणाम या महत्वपूर्ण विषयावर दुसरे सत्र आयोजित करण्यात आले होते, प्रा डॉ रत्नाकर कांबळे तर तिसऱ्या सत्रामध्ये भारतीय विकासामध्ये महिलांचा सहभाग, महिला सबलीकरण, महिलांची सद्य:स्थिती, नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर महत्वपूर्ण चर्चा घडवून आली. सत्राध्यक्ष म्हणून प्रा डॉ शिवाजी यादव हे होते. याविषयी संदर्भात डॉ. शालिनी कदम, प्रा. निलेश होदुलकर, प्रा. अनिल वाडकर   प्रा. बालाजी साबळे, श्री प्रशांत साबणे, प्रा डॉ आर डी गणापुरे, संशोधक अनुज सुतार,अनिल खरात, स्पूर्ती समुद्रे, सुमित सातपुते, उदयराज चव्हाण, दीपक जाधव, प्रार्थना कसबे आदी अभ्यासक व संशोधक यांनी अभ्यासपूर्ण शोध निबंध सादर केले.

या परिषदेत २५० पेक्षा अधिक प्राप्त झालेल्या शोधनिबंधापैकी १२७ शोधनिबंध युजीसी केअर लिस्टेड असलेल्या संशोधक नियकालिकांमधून यापूर्वीच प्रकाशन करण्यात आले, या प्रसंगी अध्यक्षीय भाषण या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,तसेच मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रकांचे प्रकाशन देखील करण्यात आले.

याप्रसंगी विचारमंचावर मा. डॉ. नरेंद्र काळे, मा. माणिकराव बावणे, मा. प्राचार्य डॉ. गौतम पाटील, डॉ. शिवाजी पाते, सचिव व कोषाध्यक्ष, डॉ. विलास खंदारे, नवनिर्वाचित अध्यक्ष मराठवाडा अर्थशास्त्र परिषद, माजी अध्यक्ष, मराठी अर्थशास्त्र परिषद, डॉ. दिलीप अर्जुने, प्रा एस एस औंढे यांची उपस्थिती होती.

अर्थशास्त्र परिषदेचे संयोजक डॉ. दीपक भारती यांनी उद्घाटक व प्रमुख अतिथी यांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोरमा पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अहिल्या बरुरे यांनी केले.

उद्घाटन सोहळ्याचे विविध वृत्त वाहिन्या,  युट्युब चॅनेल व वर्तमानपत्र यांनी घेतलेली दखल 


सह्याद्री वाहिनी 


टी व्ही ९ मराठी 

अंबाजोगाई Mirror 



Maharashtra 24 तास

दक्ष वार्ता 


YASHWANTRAO CHAVAN COLLEGE AMBAJOGAI 

वर्तमानपत्रातील बातम्या 







उद्घाटन सोहळ्यातील निवडक छायाचित्रे 
















 














No comments:

Post a Comment

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...