सामान्य लोकांना सोप्या भाषेत अर्थशास्त्र समजून सांगणे, ही अर्थशास्त्र अभ्यासकांची खरी जबाबदारी आहे...
आ. सतीश चव्हाण, सरचिटणीस, मराठवाडा
शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजी नगर
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये ३७ वे
मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न.
प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून गोखले
अर्थशास्त्र संस्था पुणे येथील सहयोगी प्राध्यापक मा. डॉ. प्रकाश व्हनकडे
हे उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्रातील तथा मराठवाड्यातील १९४७ पासून ते
आजतागायत भेडसावणारा आर्थिक प्रश्न, आर्थिक स्थिती यासंदर्भात अभ्यासपूर्ण आकडेवारीसह विवेचन केले. पूर्वी
शेतीवर अवलंबून असणारा घटक बऱ्यापैकी आपला उदरनिर्वाह करायचा परंतु सद्यस्थितीत
शेतीक्षेत्र कमी कमी होत गेल्यामुळे त्यातून आर्थिक विकास साधणे अशक्य होत आहे,
असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य मा. दत्तात्रय
पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दहा वर्षांपूर्वी शेतीमालाला असणारा भाव
आजही तोच आहे ही फार मोठी शोकांतिका आहे अशा स्वरूपाचे स्थिती असेल तर शेतकरी अथवा
शेती संदर्भातील घटक आर्थिक प्रगती करू शकणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मराठवाडा अर्थशास्त्र
परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यामागील भूमिका व्यक्त करताना प्रास्ताविक मांडताना डॉ.
दीपक भारती यांनी विशेष करून
मराठवाड्यातील आर्थिक प्रश्नावर सविस्तर चर्चा आणि विविध आर्थिक - सामाजिक समस्यांवर
विचारमंथन व्हावे व त्यासाठी उपाययोजना सुचविता याव्यात या उद्देशाने प्राध्यापक, संशोधक व अभ्यासक यांच्यासाठी प्रस्तुत
अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याचे मत व्यक्त केले.
समारोपापूर्वी डॉ. जी. एस. कल्याणकर व्याख्यानमाला अंतर्गत डॉ. सुरेश मैंद, अर्थशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ
मुंबई यांचे भारताचा शाश्वत कृषी विकास:
आशावाद व आव्हाने या विषयावर महत्वपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.
या राष्ट्रीय अधिवेशनात निबंध वाचक, अधिवेशनात सहभागी प्रतीनिधिमधून
डॉ. बाबू तोटरे, प्रा. डॉ. अनिल वाडकर, प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे
यांनी आपले मनोगत व्यक्त केले व यशस्वी आयोजनाबाबत संस्थेचे व महाविद्यालयाचे कौतुक केले. प्रस्तुत
राज्यस्तरीय अधिवेशनाच्या अनुषंगाने आलेल्या 250 पेक्षा अधिक शोधनिबंधाचे प्रकाशन
यावेळी करण्यात आले. तसेच त्या शोधनिबंधांपैकी उत्कृष्ट शोधनिबंध लिहिणाऱ्या
संशोधक, प्राध्यापकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा डॉ गणेश गावंडे यांनी करून दिला. यावेळी विचारमंचावर मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम सोलंकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.नरेंद्र काळे, श्री माणिकराव बावणे, प्रा. अरुंधती पाटील, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विलास खंदारे, मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे डॉ दिनकर टकले, डॉ शिवाजी पाते, डॉ. अर्जुन मोरे सर्व जिल्हा कार्यकारिणी, आयोजक प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, संयोजक डॉ. दीपक भारती यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अहिल्या बरुरे यांनी केले. या राज्यस्तरीय अधिवेशनास मराठवाड्यातील तसेच राज्यातील प्राध्यापक, अभ्यासक व संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनाच्या आयोजनात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
उद्घाटन सोहळ्याचे विविध वृत्त वाहिन्या, युट्युब चॅनेल व वर्तमानपत्र यांनी घेतलेली दखल
अंबाजोगाई Mirror
YASHWANTRAO CHAVAN COLLEGE AMBAJOGAI
No comments:
Post a Comment