Total Pageviews

Saturday, March 29, 2025

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न: २९ /०३/२०२५


मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,

अर्थशास्त्र  विभाग 

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 

Under MOU Activities

(State Level Workshop)

 राज्यस्तरीय कार्यशाळा   


अर्थशास्त्र विभागाच्या वतीने राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न:

अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये दिनांक 29 मार्च 2025 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई ,अर्थशास्त्र विभाग आणि राजश्री शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूर ,अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने (MOU अंतर्गत ) बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर एक दिवशीय ऑनलाइन राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्ष तथा उद्घाटक  प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट यांनी बँकिंग प्रणालीच्या इतिहासावर प्रकाश टाकत प्राचीन बँकिंग व्यवस्थेपासून ते सध्याच्या बँकिंग व्यवस्थेत  होत गेलेला बदल आणि नोकरीच्या संधी यावर प्रकाश टाकला. व सदरील कार्याशालेमुळे राज्यस्तरीय कार्यशाळेस उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन मोलाचे ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन (अर्थशास्त्र विभाग प्रमुखयशवंतराव चव्हाण महाविद्यालयअंबाजोगाई) डॉ. दीपक भारती यांनी केले व कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू व आवश्यकता सर्वांसमोर मांडली.  कार्यशाळेचे  बिजभाषक व साधनव्यक्ती म्हणून   लेफ्ट. डॉ. जगतराव धनगर (सी. सी. शेठ महाविद्यालय, अहमदाबाद, गुजरात ) यांचा परिचय डॉ. मनोरमा पवार यांनी करून दिला. कार्यशाळेचे मार्गदर्शक लेफ्टनंट डॉ. जगतराव धनगर यांनी " बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी "  या विषयावर बोलताना आजकालच्या काळात अर्थशास्त्रकॉमर्स ,सायन्स आणि इतरही क्षेत्रातील अनेक उमेदवार बँकिंग क्षेत्राकडे वळू लागले आहेत आणि त्यामुळे बँकिंग क्षेत्रात स्पर्धा भयंकर वाढली आहे बँकिंग क्षेत्रात नोकऱ्याच्या संधी याविषयी बोलताना बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधणाऱ्यांसाठी बँकिंग क्षेत्रात प्रोबेशनरी ऑफिसर,स्पेशालिस्ट अधिकारीलिपिक आणि इतर पदासाठी भरती प्रक्रिया ही आयबीपीएस आणि एसबीआय सारख्या परीक्षा द्वारे होत असते त्याची तयारी करून आपण चांगली नोकरी मिळवू शकतो असे मत व्यक्त केले. इतकेच नव्हे तर बँकिंग क्षेत्रातील नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास कसा करावा, मुलाखतीची तयारी कसी करावी व कोणती संदर्भ ग्रंथ उपयोगात आणावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर कार्यशाळेचे आभार डॉ. गाडेकर बी.पी (अर्थशास्त्र विभाग प्रमुखराजश्री शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूर)यांनी व्यक्त केले. कार्यशाळेसाठी राज्यातील विविध महाविद्यालयातील  प्राध्यापकसंशोधक विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी झूम व युट्यूब या माध्यमातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यशाळा आयोजित करण्यासाठी राजश्री शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूर चे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, दोन्ही महाविद्यालयातील अर्थशास्त्र  विभागातील सर्व प्राध्यापक व तांत्रिक बाजू सांभाळणारे  कर्मचारी  यांचे विशेष सहकार्य  लाभले.

कार्यशाळेची छायाचित्र 








वर्तमानपत्रातील बातमी 







No comments:

Post a Comment

उन्नत भारत अभियान अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा स्टार्टअप महाकुंभ, नवी दिल्ली येथे सहभाग:

  उन्नत भारत अभियान अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा स्टार्टअप महाकुंभ , नवी दिल्ली   येथे सहभाग: मराठवाडा शिक्ष...