Total Pageviews

Friday, June 27, 2025

श्रीमती ज्योती जालंदर साखरे यांची अर्थशास्त्र पीएच. डी. ( विद्यावाचस्पती ) साठीची खुली मौखिक चाचणी संपन्न: २७/०६/२०२५

 

श्रीमती ज्योती जालंदर साखरे यांची अर्थशास्त्र पीएच. डी. ( विद्यावाचस्पती ) साठीची खुली मौखिक चाचणी संपन्न


मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,

अर्थशास्त्र  विभाग व अर्थशास्त्र  संशोधन केंद्र 

श्रीमती ज्योती जालंदर साखरे यांची अर्थशास्त्र पीएच. डी. ( विद्यावाचस्पती ) साठीची खुली मौखिक चाचणी संपन्न

 डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्यविद्याशाखे अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या मौखिक चाचणीचे आयोजन आज दिनांक २७/०६/२०२५ रोजी  ऑनलाईन माध्यमाद्वारे यशस्वीरीत्या संपन्न झाले. सदरील मौखिकी ही  "महाराष्ट्रातील मानवी भांडवलाच्या गुणात्मकतेचा अभ्यास" या संशोधन विषयावर घेण्यात आली. श्रीमती ज्योती जालंदर साखरे यांनी आपल्या सादरीकरणाच्या माध्यमातून प्रस्तावना, संशोधन साहित्याचा आढावा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था व मानवी  विकास,  महाराष्ट्रातील लोकसंख्या व विविध क्षेत्रात उपलब्ध  मानवी भांडवलाच्या गुणात्मकतेचा अभ्यासमहाराष्ट्रातील मानवी भांडवलाच्या गुणात्मकतेचे  जिल्हानिहाय विश्लेषण या सहा  प्रकरणांच्या माध्यमातून संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष मांडून महाराष्ट्रातील मानवी भांडवलाची गुणात्मकता वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक उपायांबाबत शिफारशी सर्वांसमोर मांडल्या. द्वितीयक माहितीच्या आधारे प्राप्त सांख्यिकीय माहितीचे विविध सांख्यिकीय तक्ते व आलेख या माध्यमातून विश्लेषण करून प्रस्तुत संशोधन कार्य  पूर्ण केल्याचे सांगितले.

 सदरील मौखिकीचे अध्यक्ष म्हणून डॉ अशोक पवारप्रोफेसर व विभागप्रमुख  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठछत्रपती संभाजीनगरतसेच बहिस्थ: परीक्षक  म्हणून प्राचार्य  डॉ. गौतम भोंग ,  पुणे  आणि  मार्गदर्शक प्रा. डॉ. दीपक एम. भारतीयशवंतराव चव्हाण महाविद्यालयअंबाजोगाई आणि  प्रमुख उपस्थिती मध्ये मा. प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठयशवंतराव चव्हाण महाविद्यालयअंबाजोगाईप्रोफेसर  डॉ. दिलीप अर्जुने (अध्यक्ष, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ),  डॉ. सुरेश खोंड (शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण)डॉ. मनोरमा पवार डॉ. गोविंद काळे , डॉ. अरविंद घोडकेडॉ. अहिल्या बरुरे,  सुशीलकुमार आचार्य आदी सर्व प्राध्यापक व प्रा. राम लोखंडेश्री आनंद मैंदश्री अविनाश फुके, श्रीमती आरती मुळे, कु. निकिता बावणे, कु. निशिगंधा कदम, श्री राहुल चौधरी  हे  संशोधक विद्यार्थी तसेच पीएच. डी . विभागातील  श्री माने व महाविद्यालयातील श्री रमेश जाधव श्री सम्राट भोसले,  श्री जयपाल साखरे (CA),  शिल्पा साखरे, श्री मनोज माने, सुवर्णा साखरे, श्री दीपक घाडगे  यांच्यासह अनेक संशोधक व प्राध्यापक ऑनलाईन उपस्थित होते

           .          online viva- छायाचित्र 












                  















No comments:

Post a Comment

श्रीमती ज्योती जालंदर साखरे यांची अर्थशास्त्र पीएच. डी. ( विद्यावाचस्पती ) साठीची खुली मौखिक चाचणी संपन्न: २७/०६/२०२५

  श्री मती ज्योती जालंदर साखरे यांची अर्थशास्त्र पीएच. डी. ( विद्यावाचस्पती ) साठीची खुली मौखिक चाचणी संपन्न मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ सं...