मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,
अर्थशास्त्र
विभाग
अर्थशास्त्र विभागाच्या वतीने (ICT - Guest Lecture)
अतिथी व्याख्यान संपन्न
दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बी. ए. च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील व एम. ए. च्या विध्यार्थ्यांकरिता अतिथी व्याख्यानाचे आयोजन केले होते.
विषय- भारतीय बँकिंग क्षेत्राची वाटचाल: एक आढावा
दिनांक
२५ ऑगस्ट २०२५ रोजी
म. शि. प्र. मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे मा. प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या
अध्यक्षतेखाली अर्थशास्त्र
विषयावरील अतिथी व्याख्यान
संपन्न झाले. या प्रसंगी साधनव्यक्ती म्हणून
बोलताना प्रा. डॉ. ईश्वर छानवाल
(यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ) यांनी “भारतीय बँकिंग क्षेत्राची वाटचाल: एक आढावा” या
विषयावर बोलताना १९९१ च्या नवीन आर्थिक
धोरण स्वीकारानंतर बदलेले भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व त्यानंतरच्या कालावधीत
होत असलेली भारतीय बँकिंग क्षेत्राची वाटचाल याबाबत सविस्तर भाष्य केले. विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञांच्या युगात
भारतीय बँकिंग क्षेत्राचे बदलेले स्वरूप व त्यातून होत असलेली बँकिंग क्षेत्राची
वाटचाल व व्युव्हरचना यांची सांगोपांग
चर्चा केली.
अध्यक्षीय समारोप करताना मा. प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ म्हणाले की, जगातील
आघाडीची अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला ओळखली जाते. या पार्श्वभूमीवर
आपल्या अर्थव्यवस्थेची व पर्यायाने बँकिंग क्षेत्राची होत असलेली वाटचाल विशेषतः E- Banking प्रणाली अधिक महत्वाची ठरते आहे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.
दीपक भारती यांनी प्रारंभीच
प्रास्ताविकाच्या माध्यामातून अतिथी व्याख्यानाच्या अयोजानाची भूमिका सर्वांसमोर ठेवली.
व्याख्यान कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. मनोरमा पवार यानी केले तर आभार प्रदर्शन कु. गायत्री तुरे या विद्यार्थिनीने केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित
होते. प्रस्तुत व्याख्यान कार्यक्रमास मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते ज्यांनी व्याख्यानानंतरच्या चर्चेत देखील यशस्वी सहभाग घेतला.
निवडक छायाचित्रे
No comments:
Post a Comment