Total Pageviews

Saturday, January 20, 2024

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात Mentor - Mentee program या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न: दिनांक १६.०१.२०२४

 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात Mentor - Mentee Program या  

विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय  कार्यशाळा संपन्न:






अंबाजोगाई :  दिनांक १६.०१.२०२४ रोजी म. शि. प्र. मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे Mentor Mentee Cell च्या वतीने Mentor Mentee program या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा ऑफलाईन व ऑनलाईन आयोजित करण्यात आली. कार्यशाळेसाठी  बीजभाषक व साधन व्यक्ती म्हणून डॉ. महेशकुमार एल. माने ( एस, जी. आर. जी. शिंदे  महाविद्यालय, परांडा जिल्हा धाराशिव ) तर उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.  अरुण दळवे ( वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर जिल्हा बीड) यांची उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना डॉ. अरुण दळवे यांनी शिक्षक हाच खऱ्या अर्थाने चांगला मार्गदर्शक (मेंटर)  बनू शकतो. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांना योग्य मार्गदर्शन करता येवू शकते असे मत व्यक्त केले. डॉ. महेशकुमार माने यांनी एका सत्रात Mentor Mentee  कक्ष  महाविद्यालयात कार्यान्वित करताना कोणती धोरणे राबवावित, मेंटोर म्हणून काय काय भूमिका शिक्षकांना बजावावी लागेल, या योजनेचे एकूणच स्वरूप अशा विविध बाबींवर प्रकाश टाकला तर दुसऱ्या सत्रात महाविद्यालयास  NAAC  मानांकन  प्रक्रियेला सामोरे जाताना  नवीन मार्गदर्शक तत्वानुसार या योजनेची काय भूमिका असू शकते, कोण कोणत्या Quantitative  मॅट्रिक्स या योजनेच्या माध्यमातून   कव्हर करता येवू शकतील याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 

 या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ हे उपस्थित होते,  त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून  महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाला योग्य आकार देण्यासाठी Mentor Mentee  योजना अतिशय महत्वाची असून या योजनेच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची गळती कमी करता येवू शकते असे प्रतिपादित केले. वेगवेगळ्या पातळीवर विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून गुरू - शिष्य नाते अधिक दृढ करता येईल असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, प्रा. पी. के. जाधव कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दीपक भारती व अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे समन्वयक डॉ. मुकुंद राजपंखे उपस्थित होते.  कार्यशाळेच्या प्रारंभी समन्वयक डॉ. दीपक भारती यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळा आयोजनामागची भूमिका मांडली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. मनोरमा पवार यांनी केले तर डॉ. अरविंद  घोडके यांनी आभार मानले.

या कार्यशाळेस राज्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी ऑफलाईन व ऑनलाईन मोठ्या संख्येने सहभागी  होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. अरविंद घोडके, डॉ. अहिल्या बरुरेडॉ. इंद्रजीत भगत या आयोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.


कार्यशाळा youtube लिंक 


कार्यशाळेची निवडक छायाचित्र 

















वर्तमानपत्रातील बातमी 

No comments:

Post a Comment

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...