मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सामाजिक
शास्त्रे मंडळ उद्घाटन सोहळा संपन्न:
(विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण
करणारे व्यासपीठ म्हणजे सामाजिक शास्त्रे मंडळ: डॉ. यशवंत चव्हाण)
दिनांक १५.०९.२०२५, वार सोमवार रोजी म. शि. प्र. मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय
अंबाजोगाई येथे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक शास्त्रे मंडळ उद्घाटन सोहळा संपन्न
झाला. या सोहळ्यात उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून बोलताना महिला
महाविद्यालय, अंबाजोगाई येथील प्रा. डॉ. यशवंत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या
व्यक्तिमत्वाची जडणघडण करणारे व्यासपीठ म्हणजे सामाजिक शास्त्रे मंडळ होय
असे प्रतिपादन केले. समाजरूपी संस्था टिकवून ठेवायची असेल तर या
समाजातील प्रत्येक घटनेकडे चिकित्सक/ संशोधनात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे असून सामाजिक शास्त्राचा
अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांनी वर्तमान स्थितीचा आर्थिक,सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक आदी सर्व
पैलुना समोर ठेवून अभ्यास केला पाहिजे. समाजाचा विकास होत असताना गरिबी -बेरोजगारी-आर्थिक
विषमता- पर्यावरण असमतोल यासारख्या समस्यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तरच
भविष्यात होणारा विकास हा शाश्वत विकास ठरू शकतो, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवदास
शिरसाठ म्हणाले की, सामाजिक शास्त्र ही विध्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रश्नांची जाण निर्माण करतात त्या माध्यमातून माणूस म्हणून विद्यार्थ्यानी सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे असे प्रतिपादन
केले. या प्रसंगी व्यासपीठावर सामाजिक
शास्त्रे मंडळाचे समन्वयक डॉ.दीपक भारती, डॉ. धनंजय खेबडे व सामाजिक शास्त्रे मंडळ अध्यक्ष चि.
कृष्णा सोनपारखे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रारंभी
यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. तद्नंतर सामाजिक शास्त्रे मंडळाचे समन्वयक डॉ. दीपक भारती
यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका मांडली. या
कार्यक्रमात सामाजिक शास्त्रे मंडळ विद्यार्थी पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात
आले. कु. ज्ञानेश्वरी पांचाळ, व चि.
कृष्णा सोनपारखे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून सामाजिक शास्त्रे विद्यार्थी म्हणून आमच्या व्यक्तिमत्व विकासास कसे मदत
करतात,
हे अभिव्यक्त केले. त्यानंतर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, लोकप्रशासन, भूगोल, गृहशास्त्र या सर्व विषयांच्या विद्यार्थांनी तयार केलेल्या
भित्ती पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सोहळ्याचे सूत्र संचालन सामाजिक शास्त्रे मंडळाची कोषाध्यक्ष कु. गायत्री तुरे या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन मंडळाची सदस्य कु. अनिता वानोळे या विद्यार्थिनीने
केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक डॉ . अनंत मरकाळे, डॉ. संजय सुरेवाड, डॉ. प्रकाश लोखंडे, डॉ.
मनोरमा पवार, डॉ.
रोहिणी खंदारे, डॉ.
रुपेश देशमुख, डॉ.
संजय जाधव, प्रा. महेश गोरे, प्रा. पल्लवी सोमवंशी , डॉ. राठोड तसेच इतर सर्व
प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
निवडक छायाचित्रे
दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन
No comments:
Post a Comment