Total Pageviews

Sunday, September 21, 2025

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाईच्या विद्यार्थ्यांची धारूर परिसरात शैक्षणिक सहल संपन्न: २०/०९/२०२५



              मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयअंबाजोगाई,

 यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाईच्या विद्यार्थ्यांची धारूर परिसरात शैक्षणिक सहल संपन्न. 


दिनांक 20 सप्टेंबर शनिवार रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सामाजिक शास्त्र विभाग भाषा विभाग आणि सायन्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी धारूर येथील ऐतिहासिक किल्ला,  निसर्गरम्य परिसर नर्मदा उद्योग समूहास भेट दिली. शैक्षणिक सहलीमध्ये महाविद्यालयातील 65 विद्यार्थी आणि संबंधित विषयाचे सर्व प्राध्यापक यांनी या विविध स्थळांना भेटी देऊन तेथील इतिहास भौगोलिक परिस्थिती आणि  उद्योजकता विकास या संदर्भात नर्मदा उद्योग समूहाचे व्यवस्थापक श्री मुंडे प्रा. राम लोखंडे  यांनी या उद्योगा संदर्भात माहिती दिली तसेच या उद्योगाचा परिसरातील नागरिकांना होणारा फायदा या संदर्भात सविस्तर माहिती दिली. किल्ले धारूर येथील ऐतिहासिक किल्ल्यास भेट दिली असता ज्येष्ठ पत्रकार श्री शाकीर सर यांनी किल्ल्याची ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांना दिली.   तसेच धारूर परिसरात असलेले पौराणिक मंदिर  श्रीक्षेत्र आंबा चोंडी माता मंदिरास भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. दिलीप भिसे , प्रा. अरविंद घोडके, प्रा. दीपक भारती प्रा. अनंत मरकाळे प्राध्यापक मुकुंद राजपंखे प्रा. अहिल्या बरुरे प्रा. मनोरमा पवार प्रा. पल्लवी सोमवंशी प्रा. कोंपल , प्रा. बलुरे , प्रा.सुशील कुमार आचार्य,तसेच विज्ञान विभागाचे संबंधित प्राध्यापकांनी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी पूर्तपणे सहभाग घेतला. या सहलीस धारूर परिसरातील श्री आनंद मैंद , श्री बाबासाहेब माने आणि प्रा. राम लोखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

                                  ठळक छायाचित्रे  




















ठळक व्हिडीओ 







Newspaper Cuttings



No comments:

Post a Comment

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात समान संधी केंद्राचे उद्घाटन संपन्न: २९/०९/२०२५

                         मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ,  अंबाजोगाई ,   समान संधी केंद्र  यशवंतराव चव्हा...