यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांकडून उन्नत भारत अभियानांतर्गत दत्तक गाव दगडवाडी येथे स्वातंत्र्य दिन साजरा.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथील उन्नत भारत अभियान कक्षाचे सदस्य आणि स्वयंसेवक यांनी तालुक्यातील मौजे दगडवाडी येथे जावून ग्रामस्थासोबत व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला. स्वयंसेवकांनी दत्तक गावांना भेट देवून गावातील लोकांच्या स्वच्छतेविषयीच्या अडी अडचणी जाणून घेतल्या व गावाच्या विकास योजनांबाबत या निमित्ताने चर्चा केली. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा दगडवाडी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला.हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शिवदास शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उन्नत भारत अभियान कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. दीपक भारती, सह - समन्वयक प्रा. डॉ. अहिल्या बरुरे, डॉ . अरविंद घोडके, डॉ. अनंत मरकाळे, डॉ . रोहिणी खंदारे यांनी राबविला. प्रारंभी ग्रामपंचायतीच्या वतीने गावचे सरपंच मा. श्री सिद्धेश्वर पाडुळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन पार पडले. तर प्राथमिक शाळेत मा. मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर शाळेतील मुलांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी श्रीमती उजगरे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक व गावातील लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत दगडवाडी, ग्रामउर्जा फाउंडेशन चे श्री हातागळे सर व त्यांचे सर्व सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, दगडवाडी येथील सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ या सर्वांचे सहकार्य लाभले.
ठळक छायाचित्रे
ठळक व्हिडिओ
No comments:
Post a Comment