Total Pageviews

Saturday, January 20, 2024

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न:२०.०१.२०२४

 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व संशोधन  

केंद्राच्या वतीने  एक दिवसीय राज्यस्तरीय  कार्यशाळा संपन्न:






अंबाजोगाई :  दिनांक २०.०१.२०२४ रोजी म. शि. प्र. मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने ‘सामाजिक शास्त्र संशोधन: मुलतत्वे व पद्धती’  या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा ऑनलाईन झूमवर आयोजित करण्यात आली. कार्यशाळेसाठी  बीजभाषक व साधन व्यक्ती म्हणून डॉ. घनशाम  येळणे  (प्राध्यापक व संचालक, सामाजिक शास्त्रे संकुल, स्वामी  रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) यांनी बीजभाषनातून सामाजिक शास्त्रे संशोधन हे मानवी समाजाचा, मानवी वर्तवणुकीचा  संशोधनात्मक अभ्यास करण्याचे प्रभावी माध्यम असून सामाजिक संशोधन पद्धतीचा प्रामाणिक उपयोग संशोधकांनी केला पाहिजे असे प्रतिपादन केले. दुसऱ्या सत्रात साधनव्यक्ती म्हणून डॉ. सुभाष कोंबडे  (अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांची ऑनलाईन उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना डॉ. सुभाष कोंबडे  यांनी सामाजिक शास्त्रीय संशोधन करत असताना प्राथमिक माहिती संकलनातील विविध स्त्रोतांचा उपयोग करताना नमुना निवड किती महत्वपूर्ण असते. नमुना निवडत असताना संशोधकांनी कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर सादरीकरण केले. तर तिसऱ्या सत्रात साधनव्यक्ती म्हणून डॉ. कृतिका खंदारे (सहयोगी प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) या उपस्थित होत्या. त्यांनी या सत्रात संशोधन तंत्रे आणि त्याचे उपयोजन या विषयावर आपले सादरीकरण केले. त्यांनी सामाजिक शास्त्रातील संशोधकांनी बदललेल्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलून आंतरविद्याशाखीय, बहुविद्याशाखीय संशोधनात सहभाग घ्यावा व आपले संशोधन कसे परिपूर्ण करता येवू शकते याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  

कार्यशाळेच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त करून अशा कार्यशाळेच्या माध्यमातून सामाजिक शास्त्रीय संशोधन करणाऱ्या संशोधकांना संशोधनाची योग्य दिशा मिळण्यास मदत होईल व अशा कार्यशाळा वेळोवेळी महाविद्यालय आयोजित करत राहील असा विश्वास सर्व सहभागी प्राध्यापक व संशोधकांना दिला. 

 या  कार्यशाळेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दीपक भारती यांनी केले व कार्यशाळा आयोजनामागची भूमिका कार्यशाळेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सर्वांसमोर ठेवली. कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले बीजभाषक व साधनव्यक्ती यांचा परिचय प्रा. शैलेश जाधव व प्रा. सुशीलकुमार आचार्य यांनी करून दिला तर डॉ. मनोरमा पवार यांनी आभार मानले.  या कार्यशाळेस उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, प्रा. पी. के. जाधव, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र तसेच इंग्रजी संशोधन केंद्रातील सर्व संशोधक, सर्व प्राध्यापक तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातील व विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी, संशोधन मार्गदर्शक, प्राध्यापक मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभागी होते.  



कार्यशाळा youtube लिंक

कार्यशाळेतील निवडक छायाचित्र 





ऑनलाईन सहभागी संशोधक व प्राध्यापक 



बीज भाषक  डॉ. घनशाम येळणे, (प्राध्यापक व संचालक, सामाजिक शास्त्रे संकुल, स्वामी  रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)  




साधनव्यक्ती  डॉ. सुभाष कोंबडे  (अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)



डॉ. कृतिका खंदारे (सहयोगी प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) 



डॉ. दीपक भारती , कार्यशाळा समन्वयक 



प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय 





वर्तमानपत्रातील बातमी  



यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात Mentor - Mentee program या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न: दिनांक १६.०१.२०२४

 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात Mentor - Mentee Program या  

विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय  कार्यशाळा संपन्न:






अंबाजोगाई :  दिनांक १६.०१.२०२४ रोजी म. शि. प्र. मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे Mentor Mentee Cell च्या वतीने Mentor Mentee program या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा ऑफलाईन व ऑनलाईन आयोजित करण्यात आली. कार्यशाळेसाठी  बीजभाषक व साधन व्यक्ती म्हणून डॉ. महेशकुमार एल. माने ( एस, जी. आर. जी. शिंदे  महाविद्यालय, परांडा जिल्हा धाराशिव ) तर उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.  अरुण दळवे ( वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर जिल्हा बीड) यांची उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना डॉ. अरुण दळवे यांनी शिक्षक हाच खऱ्या अर्थाने चांगला मार्गदर्शक (मेंटर)  बनू शकतो. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांना योग्य मार्गदर्शन करता येवू शकते असे मत व्यक्त केले. डॉ. महेशकुमार माने यांनी एका सत्रात Mentor Mentee  कक्ष  महाविद्यालयात कार्यान्वित करताना कोणती धोरणे राबवावित, मेंटोर म्हणून काय काय भूमिका शिक्षकांना बजावावी लागेल, या योजनेचे एकूणच स्वरूप अशा विविध बाबींवर प्रकाश टाकला तर दुसऱ्या सत्रात महाविद्यालयास  NAAC  मानांकन  प्रक्रियेला सामोरे जाताना  नवीन मार्गदर्शक तत्वानुसार या योजनेची काय भूमिका असू शकते, कोण कोणत्या Quantitative  मॅट्रिक्स या योजनेच्या माध्यमातून   कव्हर करता येवू शकतील याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 

 या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ हे उपस्थित होते,  त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून  महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाला योग्य आकार देण्यासाठी Mentor Mentee  योजना अतिशय महत्वाची असून या योजनेच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची गळती कमी करता येवू शकते असे प्रतिपादित केले. वेगवेगळ्या पातळीवर विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून गुरू - शिष्य नाते अधिक दृढ करता येईल असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, प्रा. पी. के. जाधव कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दीपक भारती व अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे समन्वयक डॉ. मुकुंद राजपंखे उपस्थित होते.  कार्यशाळेच्या प्रारंभी समन्वयक डॉ. दीपक भारती यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळा आयोजनामागची भूमिका मांडली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. मनोरमा पवार यांनी केले तर डॉ. अरविंद  घोडके यांनी आभार मानले.

या कार्यशाळेस राज्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी ऑफलाईन व ऑनलाईन मोठ्या संख्येने सहभागी  होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. अरविंद घोडके, डॉ. अहिल्या बरुरेडॉ. इंद्रजीत भगत या आयोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.


कार्यशाळा youtube लिंक 


कार्यशाळेची निवडक छायाचित्र 

















वर्तमानपत्रातील बातमी 

Tuesday, January 16, 2024

अर्थशास्त्र, इंग्रजी, व राज्यशास्त्र संशोधन केंद्राच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न: १३.०१.२०२४

 


अर्थशास्त्र, इंग्रजी,  व राज्यशास्त्र संशोधन केंद्राच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न:

कार्यशाळा अध्यक्ष : प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ

अंबाजोगाई :  दिनांक १३.0१.२०२४ रोजी म. शि. प्र. मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे इंग्रजी, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयातील संशोधन केंद्राच्या वतीने संशोधन पेपर लिहिण्याची तंत्रे  (Techniques of Research  Paper Writing) या विषयावर एक  दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून डॉ. सुनील राऊत ( इंग्रजी विभाग, बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज) तसेच डॉ. देविदास नागरगोजे ( अर्थशास्त्र विभाग, स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड) व डॉ. काकासाहेब पोकळे ( राज्यशास्त्र विभाग, व्ही. पी. कॉलेज, पाटोदा) हे उपस्थित होते. या  तिन्ही साधन व्यक्तीनी इंग्रजी, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयाच्या संशोधकांनी संशोधन पेपर लिहिताना कोणती तंत्रे उपयोगात आणली पाहिजेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  ज्यामध्ये संशोधन पद्धतीचा योग्य उपयोग,  वांगमय चौर्य विरहित लिखाण, योग्य संदर्भांचा वापर, दर्जेदार जर्नल विशेषतः UGC Care Listed, UGC Approved  Journal मधून लिखाण,   समाज उपयोगी संशोधन इत्यादी महत्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला.

             संशोधक विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या  कार्यशाळेत तिन्ही विषयाच्या मिळून 68 संशोधकांनी, प्राध्यापकांनी सहभाग घेतला. कार्यशाळेचा समारोप अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी केला. या प्रसंगी बोलताना त्यांनी संशोधन पेपर हा संशोधन पद्धतीचा पुरेपूर उपयोग करून लिहावा व  गुणात्मक संशोधनाला चालना द्यावी असे प्रतिपादन केले. कार्यशाळेच्या प्रारंभी अर्थशास्त्र विभाग प्रमुख  डॉ. दीपक भारती यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळा आयोजन मागची भूमिका मांडली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन  इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मुकुंद राजपंखे  यांनी केले तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश लोखंडे यांनी आभार मानले. या कार्यशाळेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य  व संशोधन मार्गदर्शक डॉ. रमेश शिंदे,  संशोधन मार्गदर्शक डॉ. अहिल्या बरुरे, इतर सर्व संशोधन मार्गदर्शक, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यशाळेची निवडक छायाचित्र 




प्रास्ताविक: डॉ. दीपक भारती 
सूत्रसंचालन: डॉ. मुकुंद राजपंखे 



साधनव्यक्ती: डॉ. देविदास नागरगोजे  (अर्थशास्त्र  )
साधनव्यक्ती: डॉ. काकासाहेब पोकळे  (राज्यशास्त्र )


साधनव्यक्ती: डॉ. सुनील राऊत (इंग्रजी )


          आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश लोखंडे 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात समान संधी केंद्राचे उद्घाटन संपन्न: ०५.०१.२०२४

 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात समान संधी केंद्राचे उद्घाटन संपन्न: 

उद्घाटक डॉ. जी. एस. मोटे

दिनांक ०५.०१.२०२४, वार शुक्रवार रोजी म. शि. प्र. मंडळ संचलित  यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली  समान संधी केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. जी. एस. मोटे यांनी सध्यस्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या समाज घटकांसाठी सुरु असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांची व कौशल्यावर आधारित केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची  सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. एक चांगला विध्यार्थी बनत असतानाच राष्ट्राचा एक चांगला नागरिक बनण्यासाठी वेगवेगळ्या संधी तुमच्यापर्यंत पोहोचविन्याच्या  माध्यमातून समान संधी केंद्र आपल्यासाठी सातत्याने कार्यरत असणार आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील विध्यार्थी मोठ्या संख्येने या सर्व संधींचा लाभ घेवून भविष्यात राष्ट्राचे चांगले नागरिक बनतील असा विश्वास व्यक्त केला. 

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ म्हणाले की, महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना सर्वच पातळीवर वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत असतात, त्या संधींपासून कोणीही वंचित राहता कामा नये. समान संधी केंद्राच्या माध्यमातून या वेगवेगळ्या  संधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा या केंद्राचा प्रयत्न राहील. भारतीय राज्यघटनेने आपल्या दिलेल्या समानता व न्याय  या तत्वानुसार समाजातील जे घटक विकासाच्या प्रवाहामध्ये अद्याप मागे आहेत, अशा वर्गासाठी शासनाने सुरु केलेल्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजनांची व कौशल्य विकासाच्या योजनांची माहिती व त्याबाबतचे मार्गदर्शन या केंद्राच्या माध्यमातून मिळेल. या मार्गदर्शनाचा लाभ घेवून विद्यार्थी  आपले शैक्षणिक करिअर नक्कीच  उचांवतील  अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी समान संधी केंद्राचे समन्वयक डॉ. दीपक भारती यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या अयोजानामागची भूमिका व्यक्त केली.  कार्यक्रमाचे  सूत्र संचालन प्रा. सुशीलकुमार आचार्य  यांनी  केले तर आभार प्रदर्शन समान संधी केंद्राचे सदस्य डॉ. प्रकाश लोखंडे यांनी  केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ. अरविंद घोडके, डॉ. अहिल्या बरुरे, डॉ. दिलीप भिसे, डॉ. अनंत मरकाळे, डॉ. रुपेश देशमुख, डॉ. रोहिणी खंदारे, डॉ. जाधव बी. एस., संशोधन छात्र  श्री आनंद मैंद  यांच्यासह  सर्व प्राध्यापक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमाची निवडक छायाचित्र 









वर्तमानपत्रातील बातमी 



अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...